नवी दिल्ली : अनिल अंबानी यांचा रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या (आरकॉम) चेअरमन पदाचा राजीनामा कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने फेटाळला. कंपनीविरोधात सुरू असलेल्या औद्योगिक दिवाळखोरी समाधान प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन कर्जदात्यांनी अंबानी यांना केले आहे.
‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’ने मुंबई शेअर बाजारात दिलेल्या नियामकीय दस्तावेजात ही माहिती दिली आहे. कंपनीचे संचालक रायना कराणी, छाया विराणी, मंजरी काकेर आणि सुरेश रंगचर यांचे राजीनामेही फेटाळले गेले आहेत.
रिलायन्स कम्युनिकेशन्सने म्हटले की, कर्जदाता समितीने २० नोव्हेंबरच्या बैठकीत हे राजीनामे फेटाळले. राजीनामे फेटाळल्याची माहिती संबंधित संचालकांना दिली आहे. त्यांना कंपनीचे संचालक म्हणून पूर्ववत जबाबदारी पार पाडण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ‘घटनात्मक देयते’बाबत दिलेल्या निर्णयाने आरकॉमला मोठी तरतूद करावी लागली. परिणामी सप्टेंबर २०१९ च्या तिमाहीत कंपनीला तब्बल ३०,१४२ कोटींचा तोटा झाला. भारतीय औद्योगिक इतिहासात हा आतापर्यंतचा दुसºया क्रमांकाचा सर्वांत मोठा तोटा ठरला. व्होडाफोन-आयडियाचा ५०,९२१ कोटी रुपयांचा तोटा पहिल्या स्थानी आहे.
कर्जदात्यांनी फेटाळला अनिल अंबानींचा राजीनामा
अनिल अंबानी यांचा रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या (आरकॉम) चेअरमन पदाचा राजीनामा कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने फेटाळला.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 06:46 AM2019-11-26T06:46:49+5:302019-11-26T06:47:14+5:30