मुंबई : बँकेच्या कर्जामुळे संकटात आलेल्या ‘आरकॉम’ने (रिलायन्स कम्युनिकेशन्स) स्पेक्ट्रम, टॉवर्स आणि अन्य इस्टेटची स्वतंत्रपणे विक्री करण्याचा निर्णय घेतला. यामुळे थकीत कर्ज २५ हजार कोटी रुपयांनी कमी होईल. त्यातून कंपनीच्या डोक्यावरील कर्ज ६ हजार कोटी रुपयांच्या आत येणार आहे.
८ कोटींहून अधिक युझर्स असलेली आरकॉम कंपनी तोट्यात गेल्याने बँकांचे कर्जही थकीत राहिले होते. बँकेच्या सर्व कर्जांची परतफेड कंपनी जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान टप्प्याटप्प्याने करेल, असे अनिल अंबानी यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. चीनी विकास बँकेचे आरकॉमवर असलेले कर्जही थकीत आहे. त्याची परतफेड होण्यासाठी बँकेने राष्टÑीय कंपनी कायदा लवादात (एनसीएलटी) धाव घेतली होती. ही परतफेड होण्यासाठी चीनी बँक आरकॉमच्या नवी मुंबईतील अनिल धिरूभाई अंबानी नॉलेज सिटीतील ७० टक्के समभाग खरेदी करण्याच्या विचारात आहे, तसेच टॉवर, आॅप्टिक फायबर नेटवर्कचे १० हजार कोटी आणि स्पेक्ट्रमचे ८ हजार कोटी रुपयांचे समभागही हिरानंदानी आणि गोदरेज खरेदी करण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे.
>शेअर झेपावला
या घोषणेनंतर आरकॉमच्या शेअर्समध्ये एकाच दिवसांत तब्बल ३५ टक्के वाढ होऊन तो बाजारात २३ रुपयांदरम्यान पोहोचला. या आधी तो १० रुपयांपर्यंत घसरला होता, हे विशेष. समूहातील अन्य कंपन्या, रिलायन्स कॅपिटल ७.४४ टक्के, रिलायन्स पॉवर ३.८५ टक्के, रिलायन्स इन्फ्रा २.४१ टक्के, रिलायन्स निप्पॉन लाइफ १.१५ टक्के व रिलायन्स नेव्हल आणि इंजिनीअरिंगचे शेअर्स एकाच दिवसांत ५.६८ टक्के वधारले.
आरकॉमची होणार टप्प्याटप्प्यात विक्री, अनिल अंबानींची घोषणा
मुंबई : बँकेच्या कर्जामुळे संकटात आलेल्या ‘आरकॉम’ने (रिलायन्स कम्युनिकेशन्स) स्पेक्ट्रम, टॉवर्स आणि अन्य इस्टेटची स्वतंत्रपणे विक्री करण्याचा निर्णय घेतला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:55 AM2017-12-27T03:55:06+5:302017-12-27T03:55:11+5:30