पण्याची गळती : पिकांचे होतेय नुकसानवाफगाव : वाफगाव येथील पाझर तलावाच्या पोटचारीची दुरवस्था झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. पाणी सोडूनही येथील शेतकर्यांना पाणी शेतात साचल्याने पिके सडायला लागली आहेत. पोटचारीच्या दुरुस्तीसाठी १ कोटीचा निधी मंजूर होऊनही गेल्या चार वर्षांपासून दुरुस्तीचे काम रखडलेले आहे.वाफगाव (ता. खेड) येथे ७२च्या दुष्काळानंतर पाझर तलावाचे काम करण्यात आले. त्यामुळे येथील आजूबाजूच्या परिसरातील जवळपास २००० ते २५०० एकर क्षेत्र ओलिताखाली आले व वाफगाव, वरुडे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. या पाझर तलावातून एक पोटचारी जाते. वाफगाव ते वरुडेदरम्यान जवळपास ५ किलोमीटर ही पोटचारी जाते. तीवर १,००० ते १,२०० एकर क्षेत्र सुजलाम्- सुफलाम् होते. परंतु, ही पोटचारी जीर्ण व जागोजागी खराब झाल्याने गेली काही वर्षे या पोटचारीला पाणी सोडून देखील ते शेवटपर्यंत पोहोचत नव्हते. या चारीच्या दुरुस्तीसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. कामाची निविदाही काढण्यात आली. एका वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित असताना चार वर्षांपासून हे काम रखडलेले आहे. पोटचारीचे काम सुरू असताना त्यावर देखरेख ठेवण्याचे काम येथील ठेकेचाराचे होते. मात्र, ठेकेदाराने काम निकृष्ट केल्याने पाझर तलावाच्या चार्यांची दुरवस्था झाली. चारीच्या मुख्य तोंडाशी असलेल्या सिमेंट-काँक्रिटीकरणातून पाण्याची गळती होत आहे. या परिसरातील शेतकरी गारपीट, दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा संकटात सापडला आहे. त्यात डोळ्यांसमोर असलेले पाणी वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येणार्या काळात वाफगाव व परिसरातील शेतकर्यांना आणि नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे, असे येथील सरपंचानी सांगितले. (कोट :) पोटचारीच्या शेवटच्या टप्प्यात चारीतील पाणी वाहून नेणार्या पाईपची रुंदी कमी असल्याने पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी जागेवरच थबकत आहे. यावर उपाय म्हणून लवकरच तेथे पाईप टाकण्यात येतील. काही शेतकर्यांनी चारीचा भरावा कोरला आहे. त्यामुळे पाणीगळतीचे प्रमाण वाढले असावे. संबंधित पाझर तलाव पाणीवापर संस्थेच्या ताब्यात आहे; परंतु त्यांचे योग्य नियोजन नसल्याने पाण्याचे व्यवस्थित नियोजन होत नाही. - रणशिंगे. उपअभियंता पाटबंधारे विभाग.फोटो ओळ : पोटचारीच्या पाणीगळतीमुळे शेतात साचलेले पाणी व झालेले नुकसान दाखविताना शेतकरी.
(निनाद) पाझर तलावाच्या पोटचार्यांची दुरवस्था
पाण्याची गळती : पिकांचे होतेय नुकसान
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:04+5:302015-02-14T23:51:04+5:30