मुंबई : येथे नुकत्याच पार पडलेल्या अन्नपूर्णा फूड एक्स्पो ट्रेड फेअरमध्ये लोकप्रिय पुष्प मसाल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पुष्प मसाले
वापरुन बनविलेल्या पदार्थांचा चव चाखलेला प्रत्येकजण या स्वादाचे कौतुक करताना पहायला मिळाला.
अन्नपूर्णा फूड एक्स्पो ट्रेड फेअर १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान पार पडले. यात पोलंड, तुर्की, अर्जेंटिना, दुबई, हंगेरी, अमेरिका, कोरिया, सिंगापूर, ग्रीस, जपान, इटली, जर्मनी, इंडोनेशिया, रोमानिया, बेल्जियम, फ्रान्स आदी देशांमधील कंपन्यांनी सहभाग नोंदविला. अन्नपूर्णा ट्रेड फेअरमध्ये भाग घेणाºया सर्व देशाच्या सदस्यांनी पुष्प मसाल्यांपासून तयार केलेले पदार्थ पाणीपुरी, चाट, टमाटर सूप, जलजीरा आदींचे सेवन करून मसाल्यांची स्तुती केली. याबरोबरच उत्सुकतेपोटी पुष्प मसाल्याचे संचालक सुरेंद्र सुराणा यांच्याशी विदेशी नागरिकांनी गप्पाही मारल्या. आमच्या प्लान्टमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि स्वाद याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येते. संपूर्ण प्लान्टमध्ये आयएसओ सर्टिफिकेशनकडे लक्ष पुरवून सर्व कामे केली जातात. पुष्प मसाल्यात शाही रंगत, धने पूड, सब्जी मसाला, पनीर मसाला, हळद पावडर, हिंग यांना नागरिकांकडून पसंती मिळत असल्याचेही सुराणा यांनी सांगितले. (व्या. प्र.)
अन्नपूर्णा फूड एक्स्पो ट्रेड फेअरमध्ये पुष्प मसाल्यांची जादू, सर्वांचेच लक्ष घेतले वेधून
येथे नुकत्याच पार पडलेल्या अन्नपूर्णा फूड एक्स्पो ट्रेड फेअरमध्ये लोकप्रिय पुष्प मसाल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पुष्प मसाले वापरुन बनविलेल्या पदार्थांचा चव चाखलेला प्रत्येकजण या स्वादाचे कौतुक करताना पहायला मिळाला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:26 AM2017-09-28T02:26:11+5:302017-09-28T02:26:25+5:30