Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBI कडून महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर निर्बंध; ग्राहकांना केवळ १० हजार रूपये काढता येणार

RBI कडून महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर निर्बंध; ग्राहकांना केवळ १० हजार रूपये काढता येणार

RBI नं महाराष्ट्रातील एका बँकेवर निर्बंध घातले असून आता ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ १० हजार रूपये काढता येणार आहेत. टाटा कम्युनिकेशन्स पेमेंच सोल्यूशन्स लि. आणि एनपिट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि.वरही कारवाई.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 02:11 PM2021-11-25T14:11:47+5:302021-11-25T14:12:08+5:30

RBI नं महाराष्ट्रातील एका बँकेवर निर्बंध घातले असून आता ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ १० हजार रूपये काढता येणार आहेत. टाटा कम्युनिकेशन्स पेमेंच सोल्यूशन्स लि. आणि एनपिट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि.वरही कारवाई.

another bank maharashtra trouble restrictions on malkapur urban co operative ban on withdrawal of more than 10 thousand | RBI कडून महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर निर्बंध; ग्राहकांना केवळ १० हजार रूपये काढता येणार

RBI कडून महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर निर्बंध; ग्राहकांना केवळ १० हजार रूपये काढता येणार

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर निर्बंध घातले असून ग्राहकांच्याही पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या जमा रकमेतून १० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार मल्कापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यातून १० हजार रूपये काढता येणार असल्याचं म्हटंल आहे.

महाराष्ट्रातील मल्कापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्यानं त्यावर पैसे काढण्याच्या मर्यादेशिवायही अन्य निर्बंध घालण्यात आले आहेत. आता रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय मलकापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेला कोणत्याही प्रकारचं कर्ज देता येणार नाही, तसंच कोणत्याही प्रकारची गुतवणूकही करता येणार नाही.

सहा महिन्यांपर्यंत राहणार निर्बंध
रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर लादलेले निर्बंध बुधवार संध्याकाळपासून पुढील सहा महिन्यांपर्यंत प्रभावी राहतील. परंतु निर्बंध घातले जाण्याचा अर्थ कोणत्याही बँकिंगशी निगडीत कामकाज थांबवलं जाणार नाही, असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार या बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत ही बँक काही निर्बंधांमध्येच काम करणार आहे. 

या दोन कंपन्यांवरही कारवाई
यासोबतच बुधवारी रिझर्व्ह बँकेनं रेग्युलेशनशी निगडीत नियमांचं पालन न केल्यामुळे टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (TCPSL) आणि एपनिट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (ATPL) या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली. रिझर्व्ह बँकेनं या दोन कंपन्यांवर दंड ठोठावल्याची माहिती दिली. टीसीपीएसएलला दोन कोटी रूपये तर एटीपीएलवर ५४.९३ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. "टीसीपीएसएलनं व्हाईट लेबल एटीएम सुरू करण्याच्या आणि नेटवर्थ संबंधी निर्देशांचं पालन केलं नसल्याचं दिसून आलं आहे. तर एटीपीएलनं एस्क्रो खात्यांमद्ये बॅलन्स आणि नेटवर्थशी निगडीत नियमांचं पालन केलं नाही," असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. आरबीआयनं कमर्शिअल जागांवर पेमेंटसाठी पीओएस मशीन लावणाऱ्या या दोन कपन्यांना नोटीस पाठवली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तराची समीक्षा केल्यानंतर आरबीयानं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

Web Title: another bank maharashtra trouble restrictions on malkapur urban co operative ban on withdrawal of more than 10 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.