Mukesh Ambani: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत (Reliance Industries) मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीने वायकॉम १८ मीडियामधील (Viacom18 Media) पॅरामाऊंट ग्लोबलचे (Paramount Global) स्टेक विकत घेण्याबाबत सहमती दर्शवली आहे. या करारासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजला एकूण ५१७ बिलियन डॉलर्स (४२८६ कोटी रुपये) खर्च करावे लागतील. पॅरामाउंट ग्लोबलची वायाकॉम-१८ मीडियामध्ये १३.०१ टक्के भागीदारी आहे.
पॅरामाउंटनं यूएस नियामक फाइलिंगद्वारे माहिती दिली आहे की करार अंतिम झाल्यानंतरही, ते Viacom18 ला त्यांच्या कन्टेंटचा लायसन्स देणं सुरूच ठेवेल. पॅरामाउंट आधीच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या JioCinema द्वारे आपल्या कन्टेंटचं स्ट्रिमिंग करतं.
TV18 Broadcast चा वायकॉम १८ मध्ये हिस्सा
वायकॉम १८ ही TV18 ब्रॉडकास्टची उपकंपनी आहे. टीव्ही १८ ब्रॉडकास्टचा कंपनीत ५७.४८% हिस्सा आहे. व्यवहारानंतर, वायकॉम १८ मधील टीव्ही १८ ब्रॉडकास्टचा हिस्सा ७०.४९ टक्क्यांपर्यंत वाढेल. कॉमेडी सेंट्रल, निकेलोडियन आणि एमटीव्ही यासह वायकॉम १८ कडे ४० चॅनेल्स आहेत. जर हा व्यवहार ठरलेल्या प्रक्रियेनं झाला तर रिलायन्ससाठी हे मोठं यश असेल. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ आणि डिस्नेच्या मर्जरचीही घोषणा करण्यात आली होती.