Lokmat Money > बिझनेस न्यूज > TCS ला पुन्हा झटका! अमेरिकेनं मागितले २१ कोटी डॉलर्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

TCS ला पुन्हा झटका! अमेरिकेनं मागितले २१ कोटी डॉलर्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसला अमेरिकेत मोठा झटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 09:46 AM2023-11-27T09:46:07+5:302023-11-27T09:47:58+5:30

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसला अमेरिकेत मोठा झटका बसला आहे.

Another blow to TCS American jury asked for 21 crore dollars what is the matter know details | TCS ला पुन्हा झटका! अमेरिकेनं मागितले २१ कोटी डॉलर्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

TCS ला पुन्हा झटका! अमेरिकेनं मागितले २१ कोटी डॉलर्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसला अमेरिकेत मोठा झटका बसला आहे. एका अमेरिकन ज्युरीनं कंपनीला २१ कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे १७,५०,०१,०८,५०० रुपये भरण्यास सांगितलं आहे. टाटा समूहाच्या या कंपनीवर अमेरिकन आयटी सेवा कंपनी डीएक्ससीच्या (DXC) सोर्स कोडचा गैरवापर करून त्यांचे सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म TCS Bancs विकसित केल्याचा आरोप आहे. डीएक्ससी पूर्वी सीएससी म्हणून ओळखले जात होते. दरम्यान, टीसीएसनं सीएससीच्या प्रोपरायटरी प्लॅटफॉर्ममध्ये शिरून ट्रेड सिक्रेट अॅक्सेस केल्याचं ज्युरीनं म्हटलंय.

टीसीएसला अमेरिकेत लागलेला हा दुसरा झटका आहे. यापूर्वीही अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं कंपनीला १४ कोटी डॉलर्स देण्यास सांगितले होते. त्यांनी ऑथोरायझेशनशिवाय एपिक सिस्टमच्या बेव पोर्टलला अॅक्सेस केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी ज्युरींच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं टीसीएसनं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. याचा निर्णय आता न्यायालयात होईल आणि सर्वांकडून याची माहिती मागवण्यात आली आहे. कंपनी या प्रकरणी आपली कायदेशीर लढाई कायम ठेवणार आहे.

डील हातून गेली 
VantageOne and DXC Wealth Management Accelerator इन्शुरन्स फंक्शन्स मॅनेज करते. याचा आणखी एक प्लॅटफॉर्म सायबरलाईफ आपल्या क्लायंट मनी सर्व्हिसेससाठी लाईफ आणि एन्युटी प्रोडक्टला रियल टाईम सपोर्ट देतो. मनी सर्व्हिसेस अमेरिकेची इन्शुरन्स कंपनी ट्रान्स अमेरिकेची उपकंपनी आहे. २०१८ मध्ये टीसीएसला ट्रान्सअमेरिकाकडून २.५ अब्ज डॉलर्सची डील मिळाली होती. परंतु या वर्षी जूनमध्ये ट्रान्सअमेरिकानं टीसीएससोबतची दोन अब्ज डॉलर्सची डील रद्द केली. कंपनीनं मायक्रोइकॉनॉमिक परिस्थितीचं उदाहरण देत हा निर्णय घेतला.

Web Title: Another blow to TCS American jury asked for 21 crore dollars what is the matter know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.