Gautam Adani: अंबुजा-ACC नंतर अदानी समूहाने (Adani Group) एका सिमेंट कंपनीशी करार करुन त्यात मोठा हिस्सा खरेदी केला आहे. अदानी समूहाच्या मालकीच्या अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Sanghi Industries Ltd)14 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. या डीलनंतर अंबुजाची संघी इंडस्ट्रीजमधील भागीदारी 54.51 टक्के झाली आहे. अंबुजा सिमेंटने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, प्रमोटर्स ग्रुपचे 57 लाख शेअर्स स्वतंत्रपणे खरेदी केले जातील.
सौदा कितीत झाला?अंबुजाने 3 ऑगस्ट 2023 रोजीच जाहीर केले होते की, ते सांघी इंडस्ट्रीज लिमिटेडचे सध्याचे प्रमोटर रवी सांघी आणि कुटुंबाकडून 54.74 टक्के हिस्सा खरेदी करेल. गौतम अदानी यांच्या कंपनीने मंगळवारी त्यांच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, हा सौदा 5185 कोटी रुपयांमध्ये झाला आहे. तसेच, 57 लाख शेअर्स स्वतंत्रपणे खरेदी करण्याची योजना आहे.
सांघी इंडस्ट्रीजची माहितीसांघी इंडस्ट्रीजचा सिमेंट कारखाना गुजरातमधील कच्छ भागात आहे. अंबुजा सिमेंटच्या माहितीनुसार, सांघी उद्योग भारतातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन सिमेंट आणि क्लिंकर युनिट आहे, ज्यामुळे अंबुजा सिमेंट कंपनीला मोठा फायदा होईल. या खरेदीत कॅप्टिव्ह जेटी आणि पॉवर प्लांटचाही समावेश आहे.
शेअर्समध्ये तेजीअदानी समूहाने गेल्या वर्षी जूनमध्ये अंबुजा आणि एसीसी सिमेंटला 10.5 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले होते. दरम्यान, या घोषणेनंतर अंबुजा सिमेंटचे शेअर्स 6.94% वाढीसह 507.50 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होते. तसेच, कंपनीने फक्त एका महिन्यात 20.47% परतावा दिला आहे. दुसरीकडे सांघी इंडस्ट्रीजचे शेअर्सही पाच टक्क्यांनी चढले आणि 129.25 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीचे मार्केट कॅप 33.39 अब्ज रुपये आहे.
(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)