मुबंई - राज्यातील अजून एक सहकारी बँक संकटाक सापडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातीलनाशिकमधील इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँक (Independence Co-operative Bank) मधून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत बुधवारी सांगितले की, बँकेतील ९९.८८ टक्के ठेवीदार हे पूर्णपणे डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेच्या चौकटीत आहेत.इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढण्यास घालण्यात आलेली बंदी ही सहा महिन्यांसाठी असेल. आरबीआयने सांगितले की, बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांना बचत किंवा चालू खाते तसेच अन्य कुठल्याही खात्यामधून जमा रकमेमधील कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी नसेल. बँकेतील ठेवीदार हे ठेवींच्या बदल्यात कर्जाची फेड करू शकतात. त्यासाठीही काही अटी लागू आहेत.दरम्यान, आरबीआयने बुधवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर या बँकेवर अजून काही निर्बंध लादले. त्याअंतर्गत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीआयच्या मान्यतेशिवाय कुठलेही कर्ज देऊ शकणार नाहीत. तसेच कुठल्याही कर्जाचे नुतनीकरण करू शकणार नाहीत. याशिवाय कुठलीही गुंतवणूक किंवा कुठल्याही रकमेची फेड करणार नाहीत.आरबीआयच्या म्हणण्यानुसार बँक निर्बंधांनंतरही आपला बँकिंग व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवू शकेल. हे निर्बंध आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत सुरू राहतील. केंद्रीय बँकेने हेसुद्धा सांगितले की, रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार निर्बंधांमध्ये दुरुस्तीही करू शकते.डीआयसीजीसी म्हणजे काय?बँकांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत जमा रक्कम सुरक्षित राहण्याची हमी डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून दिली जाते. डीआयसीजीसी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वामित्वाखालील सब्सिडियरी आहे. ती बँकेतील जमा रकमेवर इंश्योरन्स कव्हर उपलब्ध करून देते. पाच लाख रुपयांच्या डिपॉझिट विम्याची तरतूद आहे. त्यानुसार बँक दिवाळखोरीत निघाल्यास खातेदाराला पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.
राज्यातील अजून एक सहकारी बँक संकटात, आरबीआयने पैसे काढण्यावर घातली बंदी
By बाळकृष्ण परब | Published: February 11, 2021 8:18 AM
Banking Sector News : बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांना बचत किंवा चालू खाते तसेच अन्य कुठल्याही खात्यामधून जमा रकमेमधील कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी नसेल.
ठळक मुद्देरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील नाशिकमधील इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढण्यावर घातली बंदी बँकेतील ९९.८८ टक्के ठेवीदार हे पूर्णपणे डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेच्या चौकटीतइंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढण्यास घालण्यात आलेली बंदी ही सहा महिन्यांसाठी असेल