Join us

अनिल अंबानींची आणखी एक कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर? आता 'हे' मोठं नाव आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:24 PM

न्यूयॉर्क स्थित फायनान्सर जेसी फ्लॉवर्सन कंपनी कर्ज फेडण्यात अयशस्वी ठरल्याचं न्यायालयाला म्हटलंय.

Reliance Innoventures Insolvency Proceedings: उद्योजक अनिल अंबानी यांच्या हातून आणखी एक कंपनी निसटण्याच्या मार्गावर आहे. यावेळी रिलायन्स इनोव्हेंचरचं नाव समोर आलंय. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलनं (NCLT) रिलायन्स इनोव्हेंचर्सला दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अॅडमिट केलंय. न्यूयॉर्क स्थित फायनान्सर जेसी फ्लॉवर्सन कंपनी कर्ज फेडण्यात अयशस्वी ठरल्याचं न्यायालयाला म्हटलंय.

जेसी फ्लॉवर अॅसेट रिकन्स्ट्रक्शननं डिसेंबर २०२२ मध्ये येस बँकेचं ४८,००० कोटी रुपयांचे बॅड लोन विकत घेतलं. ईटीच्या अहवालात न्यायालयाच्या कागदपत्रांचा हवाला देत म्हटलेय की, बँकेनं २०१५ आणि २०१७ मध्ये अंबानींच्या कंपनीला दिलेलं कर्ज जेसी फ्लॉवरला मिळालं होतं.

किती कोटींचं कर्ज डिफॉल्ट?कागदपत्रांनुसार, येस बँकेने रिलायन्स इनोव्हेंचर्सचं १ हजार कोटी रुपयांचं टर्म लोन आणि नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जेसी फ्लॉवर्सला दिलं होतं. जेसी फ्लॉवर्सचा दावा आहे की अंबानींच्या कंपनीनं १०० कोटी रुपयांचे व्याज फेडलेलं नाही.

रिलायन्स इनोव्हेंचर्सनं एनसीएलटीमधील जेसी फ्लॉवर्सच्या दाव्याला विरोध केला आणि तसंच कंपनीनं कोणत्याही पेमेंटमध्ये डिफॉल्ट केलेलं नसल्याचंही म्हटलंय. अनिल अंबानींच्या कंपनीने दावा केला की फायनान्सरला दिलेल्या तारणाचं मूल्य त्याच्या थकित कर्जाची भरपाई करण्यासाठी थकित कर्जापेक्षा जास्त आहे. फायनॅन्सरला दिलेली कोलॅटरल व्हॅल्यू त्यांच्या कर्जाला कव्हर करण्यासाठी आऊडस्टँडिंग डेटपेक्षा अधिक असल्याचंही कंपनीनं म्हटलंय.

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स