फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड (FSNL) मधील सरकारचा संपूर्ण हिस्सा विकण्यासाठी अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) गुरुवारी निविदा मागवल्या आहेत. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर करण्याची अंतिम तारीख 5 मे ठेवण्यात आली आहे.
गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागने म्हटले आहे की, "भारत सरकार MSTC लिमिटेडची 100% उपकंपनी असलेल्या फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड (FSNL)च्या व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणासह धोरणात्मक विक्रीद्वारे निर्गुंतवणूक करत आहे."
BDO India LLP प्रस्तावित निर्गुंतवणुकीसाठी व्यवहार सल्लागार म्हणून काम करत आहे. MSTC ची उपकंपनी असलेल्या FSNL ची स्थापना 1979 मध्ये झाली होती. FSNL ची धोरणात्मक विक्री 2022-23 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. सरकारने 2022-23 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीतून 65,000 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.