Lokmat Money > बिझनेस न्यूज > गरज भासल्यास आणखी प्रोत्साहन पॅकेज - सीतारामन

गरज भासल्यास आणखी प्रोत्साहन पॅकेज - सीतारामन

कोरोनाचा प्रभाव : दुसऱ्या व तिसºया तिमाहीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 02:00 AM2020-09-30T02:00:28+5:302020-09-30T02:00:55+5:30

कोरोनाचा प्रभाव : दुसऱ्या व तिसºया तिमाहीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा

Another incentive package if needed - Sitharaman | गरज भासल्यास आणखी प्रोत्साहन पॅकेज - सीतारामन

गरज भासल्यास आणखी प्रोत्साहन पॅकेज - सीतारामन

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला गरज भासल्यास आणखी एक प्रोत्साहन पॅकेज दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. एप्रिल-जूनच्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी हे वक्तव्य केले.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, चालू वित्त वर्षाच्या दुसºया आणि तिसºया तिमाहीत अर्थव्यवस्था चांगले वळण घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यासाठी काय करता येईल, यावर आम्ही विचारमंथन करीत आहोत. वास्तविक पहिल्या तिमाहीवर संपूर्ण लॉकडाऊनचा प्रभाव होता. त्यामुळे घसरण दिसत आहे. त्यानंतर हळूहळू अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली. जुलैपर्यंत अनेक उद्योगांची क्षमता वाढली. आता अनेक उद्योगांकडून मला कळतेय की, ते कोविडपूर्व पातळीवर पोहोचले आहेत. सीतारामन यांनी सांगितले की, लोक प्रतिकूल परिस्थितीचा मजबुतीने सामना करीत असून, झेप घेण्यासाठी तयार आहेत, असे मला वाटते.

अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राचे विश्लेषण सुरू
च्दुसरे प्रोत्साहन पॅकेज देण्याची मागणी उद्योगांकडून केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले असता सीतारामन यांनी सांगितले की, आम्ही सर्वांचे ऐकून घेत आहोत. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्राचे विश्लेषण करीत आहोत.
च्गरज भासल्यास आणखी एका पॅकेजचा पर्याय मी खुलाच ठेवला
आहे. आम्ही उद्योगक्षेत्राशी सातत्याने संवाद साधत आहोत. तथापि,
आम्ही घाईघाईने कोणताही निर्णय घेणार नाही. आम्ही आतापर्यंत
ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्यांचा लाभ सर्वांना होईल, हे पाहिले
आहे. कोणाच्या तरी पारड्यातले काढून दुसºया कुणाच्या पारड्यात
टाकलेले नाही.

Web Title: Another incentive package if needed - Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.