Join us

आणखी एक ऑक्टोबर हिट...आता महागाईचाही बसणार चटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 8:13 PM

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे महागाई वाढणार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीयबाजारातील तेजीमुळे येत्या ऑक्टोबरमध्ये उष्णतेसोबतच महागाईचे चटकेही सहन करावे लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीयबाजारानुसार केंद्र सरकार नैसर्गिक गॅसच्या दरांमध्ये 14 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे सीएनजीच्या दरांमध्येही वाढ होईल. तसेच वीज आणि युरियाच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होणार आहे. 

सध्या नैसर्गिक गॅसचा घरगुती उत्पादकांना प्रति युनिट 3.06 डॉलर मिळतात. ऑक्टोबरमध्ये यात 14 टकक्यांची वाढ झाल्यास 3.5 डॉलरवर जाणार आहे. गॅस उत्पादकांना मिळणाऱ्या नैसर्गिक गॅसच्या दराचा सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. तसेच नवे दर अमेरिका, रशिया आणि कॅनडामधील किंमतीवर ठरविला जातो. 

यानुसार वाढलेल्या दरांची घोषणा 28 सप्टेंबरला होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. भारत आपल्या गरजेच्या 50 टक्के गॅस आयात करतो जी घरगुती गॅसच्या किंमतीच्या दुप्पट किंमतीला पडते. घरगुती गॅसचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू होणार आहेत. आणि हे दर ऑक्टोबर, 2015 ते मार्च, 2016 मधील दरांनंतर सर्वात जास्त असणार आहेत. या काळात गॅसच्या प्रती युनिटला 3.82 डॉलरचा दर होता. 

नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढल्याने त्याचा थेट फायदा सरकारी कंपनी ओएनजीसी आणि रियालन्स इंडस्ट्रीजला होणार आहे. यामुळे सीएनजीच्या किंमतीही वाढणार आहेत. तसेच  वीज आणि युरियाच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होणार आहे.

 

टॅग्स :महागाईपेट्रोलओएनजीसीरिलायन्सबाजारआंतरराष्ट्रीय