Lokmat Money > बिझनेस न्यूज > एमएसएमईसाठी लवकरच दुसरे पॅकेज

एमएसएमईसाठी लवकरच दुसरे पॅकेज

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ मार्च २०२० रोजी १.७० लाख कोटी रुपयांच्या उद्योगाचे पहिले प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते. पुढील पॅकेज १७ मेनंतर लॉकडाउननंतरच्या परिस्थितीशी निगडित राहणार आहे. ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:07 AM2020-05-12T00:07:58+5:302020-05-12T00:08:50+5:30

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ मार्च २०२० रोजी १.७० लाख कोटी रुपयांच्या उद्योगाचे पहिले प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते. पुढील पॅकेज १७ मेनंतर लॉकडाउननंतरच्या परिस्थितीशी निगडित राहणार आहे. ​​​​​​​

Another package for MSME soon | एमएसएमईसाठी लवकरच दुसरे पॅकेज

एमएसएमईसाठी लवकरच दुसरे पॅकेज

नवी दिल्ली : सरकार उद्योगांसाठी विशेषत: सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) दुसरे प्रोत्साहन पॅकेज या आठवड्यात जाहीर करणार असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ मार्च २०२० रोजी १.७० लाख कोटी रुपयांच्या उद्योगाचे पहिले प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते. पुढील पॅकेज १७ मेनंतर लॉकडाउननंतरच्या परिस्थितीशी निगडित राहणार आहे.

पहिल्या पॅकेजमध्ये सरकारने सर्व एमएसएमई कर्जाच्या हप्त्यांवर तीन महिन्यांची स्थगिती जाहीर केली होती. दुसऱ्या पॅकेजमध्ये एमएसएमई आणि लघु उद्योगांना पत हमी आणि स्थलांतरित कामगारांना रोख समर्थनदेखील देऊ शकते.

सरकारने जाहीर केलेल्या एमएसएमईसाठी ही पहिली पतहमी योजना असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पॅकेजला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत आणि लवकरच याची घोषणा होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Another package for MSME soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.