देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. तर दुसरीकडे चीनची अवस्था मात्र वाईट आहे. भारत सातत्यानं प्रगतीच्या मार्गावर पुढे जातोय. शुक्रवारी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील जीएसटी संकलनात (GST Collection) मोठी वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपये होते, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे.
नोव्हेंबर २०२३ हा महिना सरकारसाठी उत्तम महिना ठरला आहे. वार्षिक आधारावर जीएसटी संकलनात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा सलग नववा महिना आहे जेव्हा मासिक जीएसटी संकलन १.५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलेय.
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत नोव्हेंबर २०२३ मध्ये जीएसटी संकलनात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ही सहावी वेळ आहे जेव्हा जीएसटी संकलन १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे.
यामुळे आली तेजी
जीएसटी संकलनात या वाढीमागील कारण म्हणजे सणासुदीचा काळ आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, धनत्रयोदशी, छठसारख्या सणांमुळे जीएसटी संकलनात मोठी उडी आली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपये आहे, जे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढलं आहे. दरम्यान, ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात घट झाली. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन १.७२ लाख कोटी रुपये होतं.
अर्थव्यवस्थेच्या जबरदस्त तेजीदरम्यान आली आणखी एक गुड न्यूज, GST संकलनात बंपर वाढ
जीसटी संकलनात तेजी आल्यानं सरकारी तिजोरी भरली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 10:53 AM2023-12-02T10:53:07+5:302023-12-02T10:54:13+5:30