Join us

हिरे व्यावसायिक मेहुल चोकसीचे अँटिग्वात पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 3:56 AM

हिरे व्यापारी मेहुल चोकसी आता अमेरिकेतून अँटिग्वामध्ये गेला आहे व त्या कॅरेबियन देशचा त्याने पासपोर्टही मिळविला आहे.

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेस (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोकसी आता अमेरिकेतून अँटिग्वामध्ये गेला आहे व त्या कॅरेबियन देशचा त्याने पासपोर्टही मिळविला आहे. ‘पीएनबी’ घोटाळ््यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा मेहुल चोकसी हा मामा आहे.चोकसी याच महिन्यात अँटिग्वामध्ये आला व त्याने तेथील पासपोर्ट घेतला, अशी माहिती ‘इंटरपोल’ने काढलेल्या नोटिशीनुसार त्या देशाने भारतास कळविली असल्याचे माहितगार सूत्रांनी सांगितले.‘पीएनबी’ घोटाळा उघड होऊन गुन्हा नोंदविला जाण्यापूर्वीच चोकसी भारतातून फरार झाला. मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट काढल्यानंतर सीबीआयने त्याआधारे चोकसीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करण्याची विनंती ‘इंटरपोल’ला केली. मात्र, अद्याप तशी नोटीस जारी झालेली नाही. नीरव मोदीविरुद्ध अशी नोटीस या आधीच जारी झाली आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळापंजाब नॅशनल बँकनीरव मोदी