Join us

'या' IPO चं २०% प्रीमिअमसह धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना बंपर फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 11:36 AM

हा आयपीओ बीएसईवर 20.65 टक्क्यांच्या प्रीमियमसह 187 रुपयांवर लिस्ट झाला.

Apeejay Surrendra Park IPO चं शेअर आज शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग झालं. हा आयपीओ बीएसईवर 20.65 टक्क्यांच्या प्रीमियमसह 187 रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीच्या आयपीओची किंमत 147 ते 155 रुपये प्रति शेअर होती. कंपनी बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी लिस्ट झाली आहे. 

धमाकेदार लिस्टिंगनंतर कंपनीचा आयपीओ प्रॉफिट बुकिंगचा बळी ठरला आहे. लिस्ट झाल्यानंतर या स्टॉकमध्ये 7 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कंपनीनं 96 शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 14,880 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त 1248 शेअर्स घेण्याची परवानगी होती. कंपनीनं कर्मचाऱ्यांना एका शेअरवर 7 रुपयांची सूट दिली होती. 

कंपनीच्या आयपीओची साईज 920 कोटी रुपये होती. यामध्ये फ्रेश इश्यूद्वारे 600 कोटी रुपये जमवण्यात आले आहेत. त्याच वेळी, ऑफर फॉर सेल अंतर्गत 320 कोटी रुपये उभे केले आहेत. 

70 पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन 

IPO 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान खुला होता. या 3 दिवसात IPO 70 पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब झाला. आयपीओला ओपनिंगच्या दिवशीच 62.91 पटींपेक्षा जास्त सबस्क्रिप्शन मिळाले. हा आयपीओ रिटेल कॅटेगरीत 32 पटींपेक्षा अधिक सबस्क्राइब झाला होता. तर क्लालिफाईड इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीमध्ये तो 79.29 पट सबस्क्राईब झाला. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या मजबूत लिस्टिंगचे संकेत आधीच दिसत होते. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार