मुंबई : शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहकांची तयार बाजारपेठ मिळवून देणारे ‘आय मंडी’ हे आगळे अॅप तयार करण्यात आले आहे. यामुळे देशभरातील साडे पाच कोटी शेतकरी ग्राहकांशी संलग्न होणार असून त्यामध्ये ३० हजार गोदामांचाही समावेश आहे.
इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-आॅप लिमिटेड (इफ्को) ही केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरू असलेली देशातील पहिली खतनिर्मिती सहकारी संस्था आहे. इफ्कोने आजवर ७२ लाख टन खतनिर्मितीद्वारे देशभरातील कोट्यवधी शेतकºयांना जोडले आहे. या शेतकºयांना कर्ज सुविधेसह त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी आता आगळे ‘आय मंडी अॅप’ कंपनीने तयार केले आहे. मुंबईत या अॅपचे उद्घाटन झाले.
याबाबत इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उदय शंकर अवस्थी यांनी सांगितले की, हे शेतकºयांसाठीचे देशातील एकमेव एकात्मिक अॅप आहे. यामध्ये शेती
संबंधित उत्पादनांची माहिती दिली जाईलच. याखेरीज ग्राहकांपयोगी वस्तू कुठल्या असून त्यांची बाजारात विक्री करणे, पीक कर्जे, पीक
विमा, गोदामे या सर्वांची माहिती अॅपमध्ये असेल.
>‘आयमंडी’ची वैशिष्ट्ये
२.५० : शेतकरी कुटुंब
३६,००० : गोदामे
१६,००० : गावे
५५,००० : किरकोळ विक्री केंद्रे
>5.5
कोटी शेतकºयांना होणार लाभ
अॅपद्वारे शेतमालाला थेट बाजारपेठ, ३० हजार गोदामांचाही समावेश
शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहकांची तयार बाजारपेठ मिळवून देणारे ‘आय मंडी’ हे आगळे अॅप तयार करण्यात आले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:25 PM2018-07-16T23:25:25+5:302018-07-16T23:25:35+5:30