Join us

यू ट्यूब लाँच करणार डेटा वाचवणारं अॅप

By admin | Published: September 27, 2016 5:56 PM

स्लो इंटरनेट कनेक्शन असेल तरी अगदी आरामात ऑफलाइन व्हिडीओ सेव करणं शक्य

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27- ऑनलाइन व्हिडीयोसाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या यू ट्यूबने यु ट्यूब गो हे अॅप लाँच करण्याची घोषणा केली आहे. या अॅपचं वैशिष्ट्य म्हणजे यू ट्यूबवरचे व्हिडीयो सेव्ह करून ऑफलाइन पाहता येणार आहेत, तसेच ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शनच नाहीये अशांसोबतही हे डाऊनलोड केलेले व्हिडीयो शेअर करता येणार आहेत.
या नव्या सेवेमध्ये व्हिडीयोचा प्री व्ह्यू बघता येण्याची सोय आहे, तसेच व्हिडीयो किती मोठा आहे, किती एमबी डेटा घेईल हे देखील डाउनलोड करायच्या आधी समजणार आहे. दिल्लीमध्ये 'गुगल फॉर इंडिया' या कार्यक्रमात कंपनीने याबाबतची घोषणा केली.
जास्तीत जास्त लोकांना व्हिडीओ शेअरींग सर्विससोबत जोडणं हा या अॅप मागील मुख्य उद्देश आहे. स्लो इंटरनेट कनेक्शन असेल तरी अगदी आरामात ग्राहक ऑफलाइन व्हिडीओ सेव करू शकतात असा कंपनीचा दावा आहे. 'मजा घ्या, डेटा वापरू नका' अशी टॅगलाइन या अॅपला देण्यात आली आहे. कोणत्या क्वालिटीचा आणि किती साइजचा व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे हे युजर्स ठरवू शकतो. तसेच त्यासाठी किती डेटा वापरला जाणार आहे हे देखील युजरला कळणार आहे. प्ले-स्टोअरमधून हे अॅप डाउनलोड करता येणार आहे. 
येत्या दोन महिन्यात हे अॅप दाखल करण्यात येणार आहे. सध्या हे अॅप 5 भारतीय भाषांना सपोर्ट करतं मात्र येणा-या काही दिवसात 10 भाषांना अॅप सपोर्ट करेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.