Join us

‘ग्रो इन इंडिया’साठी सेंटेग्रोचे केंद्राला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:31 AM

‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘ग्रो इन इंडिया’ मोहीम राबविणे आवश्यक आहे, असे आवाहन सेंटर फॉर इन्व्हायर्नमेंट अँड अ‍ॅग्रीकल्चर (सेंटेग्रो) या स्वयंसेवी संस्थेने आपल्या अहवालातून केंद्र सरकारला केले

मुंबई : ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘ग्रो इन इंडिया’ मोहीम राबविणे आवश्यक आहे, असे आवाहन सेंटर फॉर इन्व्हायर्नमेंट अँड अ‍ॅग्रीकल्चर (सेंटेग्रो) या स्वयंसेवी संस्थेने आपल्या अहवालातून केंद्र सरकारला केले, तसेच कृषी उत्पन्न आयात-निर्यातीवर देखरेख ठेवण्यास स्वतंत्र प्राधिकरण असावे, असेही सुचविले आहे.या संस्थेने भारतातील शेती व शेतकरी यांच्या स्थितीचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला असून, त्याचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बोलताना सेंटेग्रो व क्रॉप केअर फडरेशन इंडियाचे अध्यक्ष राजू श्रॉफ यांनी शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यासाठी मुळात देशाबाहेरील व देशांतर्गत कृषी मालाची मागणी वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती केली.