Join us

कोविडमध्ये भारतात मोठा बिझनेस, Apple ने तीन महिन्यात विकले एवढे iphone

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 4:10 PM

Apple ने भारतात एक खास आगळा वेगळा रेकॉर्ड बनवला आहे. Apple चे सीईओ टिम कुकने म्हटले की

जगातील सर्वात लोकप्रिय असणारी स्मार्टफोन कंपनी अ‍ॅपलने सप्टेंबर 2022 मध्ये नवी स्मार्टफोन iPhone 14 सेरीज लाँच केली. अ‍ॅपलच्या या माबोईलाही ग्राहकांची मोठी पसंती मिळाली. भारतातही अ‍ॅपल मोबाईलची क्रेझ चांगलीच वाढली असून अ‍ॅपलचा फोन वापरणं हे एकप्रकारचं प्रतिष्ठेचं लक्षण बनलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना अ‍ॅपलचे फोन वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे वृत्त माध्यमात झळकले होते. त्यावरुन, अ‍ॅपल फोनची क्रेझ लक्षात येईल. विशेष म्हणजे कोविडच्या काळातही कंपनीने भारतात लाखो फोनची विक्री केली आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनीच यासंदर्भात माहिती दिली. 

Apple ने भारतात एक खास आगळा वेगळा रेकॉर्ड बनवला आहे. Apple चे सीईओ टिम कुकने म्हटले की, कंपनीने ब्राझील आणि भारतात तिमाहीत रेकॉर्ड सोबत भारतीय बाजारासाठी आणखी एक रिवेन्यू रेकॉर्ड बनवला आहे. आपल्या तिमाहीतील आकडेवारीला पोस्ट केल्यानंतर कुक यांनी गुरुवारी म्हटले की, भारतात व्यापार करताना आम्ही एक तिमाही रिवेन्यू रेकॉर्ड बनवला आहे. वर्षापाठोपाठ आकड्यात वाढ होत आहे. त्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. भारतात कोविड काळातही कंपनीने मोठा बिझनेस केला असून २०२२ च्या तिमाहीत कंपनीने तब्बल २० लाख आयफोनची विक्री केली आहे. 

आम्ही बाजारावर जास्त फोकस करीत आहोत. प्रोडक्टला खूप स्वस्त बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तसेच जास्त ऑफर्स देण्याचाही प्रयत्न आहे. कंपनीचे चीफ फायनान्शियल अधिकारी लुका मास्त्री यांनी सांगितले की, ब्राझील, मॅक्सिको, भारत, इंडोनेशिया, थायलँड आणि व्हिएतनाम सारख्या बाजारात मजबुत वाढ दिसत आहे. त्यात, भारत आणि ब्राझीलमध्ये गतवर्षीच्या तिमाहीत रेकॉर्डब्रेक विक्री करण्यात आली आहे. 

दरम्यान, भारतात सद्यस्थितीत व्यापारी, उद्योजक, ब्युरोक्राफ्ट आणि राजकीय नेतेमंडळींकडे अ‍ॅपलचाच फोन पाहायला मिळतो. तर, सर्वसामान्यांमध्ये आयफोनची क्रेझ वाढली असून, त्यामुळेच आयफोनचा सेल भारतात वाढला आहे. 

टॅग्स :अ‍ॅपल आयफोन Xव्यवसायकोरोना वायरस बातम्याभारत