Apple Fined : अमेरिकन आयफोन उत्पादक कंपनी अॅपल आपल्या प्रायव्हसी पॉलिसीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आयफोन वापरकर्त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते, असा कंपनीचा दावा आहे. सुरक्षेच्या कारणामुळे जगभरातील लोक आयफोनला पहिली पसंती देतात. मात्र, याच कारणामुळे अॅपल कंपनी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कंपनीवर १५ कोटी युरोपेक्षा जास्तीचा दंड ठोठावण्यात आला आहे. फ्रान्सच्या कॉम्पिटीशन नियामकाने ही कारवाई केली आहे. अॅपलने एप्रिल, २०२१ आणि जुलै, २०२३ दरम्यान iOS आणि iPad डिव्हाइसेससाठी मोबाइल ऍप्लिकेशन्सच्या वितरणामध्ये आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा ठपका नियमकाने ठेवला आहे.
काय आहे प्रकरण?आयफोनमधील अॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी (ATT) फ्रेमवर्कचा उद्देश थर्ड पार्टी ऍप्लिकेशन्सला डेटा संकलनासाठी संमती देणे किंवा नाकारणे यासाठी आहे. मात्र, अॅपलची ही कृती स्वतःच्याच प्रायव्हसी पॉलिसीच्या विरुद्ध असल्याचे फ्रान्सच्या स्पर्धा नियामकाने म्हटले आहे. म्हणजे एकीकडे कंपनी आम्ही युजर्सचा डेटा कोणत्याही थर्ड पार्टीशी शेअर करत नसल्याचा दावा करते. तर दुसरीकडे असे ऍप्लिकेशन दिल्याने विरोधाभास निर्माण होत आहे.
कंपनीला टूल बदलण्याचे आदेश नाहीतवास्तिवक, फ्रेंच नियामकाने अॅपलला हे टूल बदलण्याचे आदेश दिले नाहीत. युरोपीय देश फ्रान्सच्या स्पर्धा नियामकाने कंपनीविरुद्धच्या आपल्या निर्णयात म्हटले आहे की, "आयफोन आणि आयपॅड वापरकर्त्यांसाठी ज्या पद्धतीने हे लागू केले, ते वैयक्तिक डेटा सुरक्षिततेच्या अॅपलच्या उद्दिष्टाच्या विरुद्ध आहे." या फ्रेमवर्क अंतर्गत, iPhone किंवा iPad वापरकर्त्यांनी Apple द्वारे संचालित iOS प्रणालीमध्ये थर्ड-पार्टी अॅप्सद्वारे डेटा संकलनासाठी संमती देणे आवश्यक आहे, जेणेकरून गोपनीयता अधिक चांगल्या प्रकारे संरक्षित केली जाऊ शकते.
वाचा - भंगाराच्या बदल्यात मिळतोय नवाकोरा टीव्ही-फ्रीज; भारताच्या शेजाऱ्याची नवीन योजना
कंपनीविरोधात तक्रार कोणी केली?एटीटी आयफोन आणि आयपॅड वापरकर्त्यांना कोणते अॅप्स त्यांच्या घडामोडींचा मागोवा घेऊ शकतात हे ठरवू देते. पण, ऑनलाइन जाहिरातींवर अवलंबून असलेल्या कंपन्यांद्वारे आणि प्रतिस्पर्ध्यांकडून त्यावर टीका केली जात आहे. अॅपलविरुद्धचा खटला ऑनलाइन जाहिरातदार, प्रकाशक आणि अनेक इंटरनेट नेटवर्क्सच्या तक्रारींपासून सुरू झाला. अॅपलने त्याच्या मार्केट पॉवरचा गैरवापर केल्याचा आरोप केला. अॅपलने या संपूर्ण प्रकरणात म्हटले आहे की फ्रेंच नियामकाच्या दंडामुळे ते निराश आहे. परंतु, गोपनीयता नियंत्रण साधनामध्ये कोणत्याही विशिष्ट बदलांची आवश्यकता नसल्याचे सांगितले.