Lokmat Money > बिझनेस न्यूज > Apple'ने चीनला दिला मोठा झटका! भारताला होणार फायदा? वाचा सविस्तर

Apple'ने चीनला दिला मोठा झटका! भारताला होणार फायदा? वाचा सविस्तर

मोबाईल उत्पादनातील जगातील नामांकीत असणाऱ्या अ‍ॅपल कंपनीने चीनला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने चिनी तंत्रज्ञान कंपन्यांविरुद्ध निर्यातीचे नियम कडक केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 04:29 PM2022-10-17T16:29:06+5:302022-10-17T16:31:47+5:30

मोबाईल उत्पादनातील जगातील नामांकीत असणाऱ्या अ‍ॅपल कंपनीने चीनला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने चिनी तंत्रज्ञान कंपन्यांविरुद्ध निर्यातीचे नियम कडक केले आहेत.

Apple has stopped using memory chips from Yangtze Memory Technologies Company in China | Apple'ने चीनला दिला मोठा झटका! भारताला होणार फायदा? वाचा सविस्तर

Apple'ने चीनला दिला मोठा झटका! भारताला होणार फायदा? वाचा सविस्तर

मोबाईल उत्पादनातील जगातील नामांकीत असणाऱ्या अ‍ॅपल कंपनीने चीनला मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने चिनी तंत्रज्ञान कंपन्यांविरुद्ध निर्यातीचे नियम कडक केले आहेत. त्यामुळे आता अ‍ॅपल इंकने चीनच्या Yangtze Memory Technologies Company या कंपनीची मेमरी चिप वापरणे बंद केले आहे. त्यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे. याचा फायदा आता भारतीय कंपन्यांना होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

अॅपलने या वर्षाच्या सुरुवातीला वायएमटीसीची फ्लॅश मेमरी चिप वापरण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या चिप फक्त चिनी बाजारात विकल्या जाणार्‍या आयफोन्समध्ये वापरण्यात येत होते.

कंपनीने आता सर्व आयफोनसाठी महत्वाच्या चिपपैकी ४० टक्के चिप वायएमटीसी कडून खरेदी करण्याचा विचार करत होती. अमेरिकेने आणलेल्या नव्या नियमांमुळे वायएमटीसी कंपनीसह अन्य चिनी कंपन्यांचे मोठे नुसकसान झाले आहे.यापुढेही या कंपन्यांवर कठोर कारवाई होऊ शकते.  

काळ्या यादीत टाकलेल्या चीनी दूरसंचार कंपनी Huawei Technology Co Ltd ला चिप्स विकून अमेरिकेच्या निर्यातीशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अमेरिका वायएमटीसी विरुद्ध चौकशी करत आहे.पण अॅपलने अद्याप आपल्या बाजूने या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Electronics Mart India IPO: ५३% प्रीमिअमवर लिस्ट झाला हा IPO, एका झटक्यात गुंतवणूकदार झाले मालामाल

ब्राझीलच्या साओ पाउलो सिव्हिल कोर्टाने अॅपलला गुरुवारी १९ मिलियन डॉलर दंड ठोठावला आहे. आता चार्जरसह नवीन आयफोन त्यांच्या देशात विकण्याचे आदेश दिले आहेत. अॅपलने गेल्या दोन वर्षात ज्या लोकांना आयफोन 12 आणि आयफोन 13 सीरीज विकले आहेत त्यांनाही चार्जर देण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Apple has stopped using memory chips from Yangtze Memory Technologies Company in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.