iPhone 15 Launch Date : Apple iPhone शौकीनांसाठी महत्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्यात नवीन iPhones लॉन्च करण्याची Apple ची परंपरा 2023 मध्येही कायम राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, यावेळी iPhone 15 लॉन्चिंग उशीराने होऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्यनुसार, Apple ला कॅमेराशी संबंधित उपकरणे पुरवणाऱ्या Sony कंपनीसमोर काही अडचणी आल्या आहेत. यामुळेच iPhone 15 सीरिजमध्ये वापरणाऱ्यात येणाऱ्या कॅमेरा लेन्स पुरवण्यात सोनीला उशीर होत आहे. यामुळेच iPhone ची लॉन्चिंग उशीराने होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, कंपनीने नवीन फोनमध्ये आधुनिक ऑप्टिकल झूम क्षमता असलेली हायएंड पेरिस्कोप लेन्स देण्याचा दावा केला आहे.
काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात येतोय की, iPhone 15 Pro मध्ये ही लेन्स नसेल आणि कंपनी ठरलेल्या तारखेला आपला नवीन iPhone 15 लॉन्च करेल. पण, कॅमेरा लेन्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे iPhone 15 Pro Max च्या लॉन्चिंगवर परिणाम पडू शकतो. Apple ने यापूर्वी अशा परिस्थितींचा सामना केला आहे. तेव्हा कंपनीने iPhone 14 सीरिजमधील 14 प्लस मॉडेल उशिरा लॉन्च केले होते.
कधी होणार लॉन्च? रिपोर्ट्सनुसार, येत्या 12 सप्टेंबर रोजी iPhone 15 सीरिज लॉन्च होईल आणि 22 सप्टेंबर पासून याची प्रत्यक्ष विक्री सुरू होईल. आयफोन 15 सीरीज अंतर्गत चार मॉडेल्स बाजारात येणार आहेत. आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये नवीन A17 बायोनिक चिप असण्याची अपेक्षा आहे. ही पूर्वीच्या A16 बायोनिक चिपपेक्षा चांगली गती देईल.