Lokmat Money > बिझनेस न्यूज > अॅपल लव्हर्ससाठी खुशखबर, यावर्षी तीन iPhone होणार लॉन्च

अॅपल लव्हर्ससाठी खुशखबर, यावर्षी तीन iPhone होणार लॉन्च

टेक्नॉलॉजीमधील दिग्गज कंपनी अॅपल यावर्षी तीन नवे iPhone लॉन्च करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2017 04:13 PM2017-03-09T16:13:31+5:302017-03-09T16:13:31+5:30

टेक्नॉलॉजीमधील दिग्गज कंपनी अॅपल यावर्षी तीन नवे iPhone लॉन्च करणार

Apple Lovers Good News, 3 iPhone launches this year | अॅपल लव्हर्ससाठी खुशखबर, यावर्षी तीन iPhone होणार लॉन्च

अॅपल लव्हर्ससाठी खुशखबर, यावर्षी तीन iPhone होणार लॉन्च

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - टेक्नॉलॉजीमधील दिग्गज कंपनी अॅपल यावर्षी तीन नवे  iPhone लॉन्च करणार आहे. यामध्ये 5.8 इंच आकाराच्या ओएलइडी डिस्प्ले असलेल्या iPhone 8 चा समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र, iPhone 8 बाबत कंपनीकडून अजून कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आयफोन एक्स असं या फोनचं नाव असू शकतं. याशिवाय  आयफोन 7 सीरिजचे दोन फोन असतील.  ‘आयफोन 7s’ आणि ‘आयफोन 7s प्लस’ अशी त्यांची नावं असतील.
 
निक्केई या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे. यावर्षी अॅपल आपलं 10 वं वर्ष साजरं करत आहे, त्यामुळे यंदा  iPhone जरा वेगळा असणार आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या iPhone7 मध्ये काही फिचर्स सोडले तर जास्त बदल करण्यात आला नव्हता. रिपोर्ट्सनुसार, iPhone 8 युनिबॉडी ग्लास असणार आहे. यावेळी होम बटन नसेल तर डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. याशिवाय वायरलेस चार्जिंग आणि  OLED स्क्रीन असणार आहे.  तसंच हा बिजेल म्हणजे विना बॉर्डरची स्क्रीन असलेला फोन असू शकतो.
(iPhone ला 10 वर्ष पूर्ण, जाणून घ्या हा प्रवास)
(यावर्षी जगभरात धूम करणार हे 5 स्मार्टफोन)
 
अॅपलचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि सर्वात स्लीम आयफोन असू शकतो. याची किंमत तब्बल 1 हजार डॉलर इतकी असण्याची शक्यता आहे. मोबाईल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपल  iPhone ने 9 जानेवारी 2017 ला 10 वर्ष पूर्ण केले.  त्याच दिवशी म्हणजे 9 जानेवारी 2007 रोजी अॅपलने सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पहिला-वहिला iPhone लॉन्च केला होता. त्यावेळी अॅपलचे सीईओ होते स्टीव्ह जॉब्स. पहिला  iphone जरी 10 वर्षांपूर्वी  9 जानेवारी 2007 ला लॉन्च झाला असला तरी याची विक्री 29 जून 2007 पासून सुरू झाली. टचस्क्रीनसह 3.5 इंच डिस्प्ले असलेला हा जगातला पहिला स्मार्टफोन होता. पहिल्या वर्षी अॅपलने या फोनच्या 61 लाख युनिटची विक्री केली होती. 2008 या वर्षी   iphone ने  3G मोबाईल नेटवर्क आणि GPS ची जगाला ओळख करून दिली. अॅप स्टोअर आणि  थर्ड-पार्टी अॅप इंटिग्रेशनचंही हे पहिलं वर्ष होतं. 
 

Web Title: Apple Lovers Good News, 3 iPhone launches this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.