Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘आयआयटी’मध्ये अ‍ॅपल, नॅसडॅक, आधार प्राधिकरणही होणार सहभागी

‘आयआयटी’मध्ये अ‍ॅपल, नॅसडॅक, आधार प्राधिकरणही होणार सहभागी

चेन्नई : येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या ‘आयआयटी मद्रास’च्या प्लेसमेंट्समध्ये जागतिक कीर्तीची अमेरिकी कंपनी अ‍ॅपल तसेच नॅसडॅक व भारतीय आधार प्राधिकरण यासारख्या नामांकित संस्था पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:35 AM2017-11-25T03:35:36+5:302017-11-25T03:35:45+5:30

चेन्नई : येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या ‘आयआयटी मद्रास’च्या प्लेसमेंट्समध्ये जागतिक कीर्तीची अमेरिकी कंपनी अ‍ॅपल तसेच नॅसडॅक व भारतीय आधार प्राधिकरण यासारख्या नामांकित संस्था पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.

Apple, Nasdaq, Aadhaar Authority will also participate in IITs | ‘आयआयटी’मध्ये अ‍ॅपल, नॅसडॅक, आधार प्राधिकरणही होणार सहभागी

‘आयआयटी’मध्ये अ‍ॅपल, नॅसडॅक, आधार प्राधिकरणही होणार सहभागी

चेन्नई : येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या ‘आयआयटी मद्रास’च्या प्लेसमेंट्समध्ये जागतिक कीर्तीची अमेरिकी कंपनी अ‍ॅपल तसेच नॅसडॅक व भारतीय आधार प्राधिकरण यासारख्या नामांकित संस्था पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. जागतिक पातळीवरील इतरही अनेक मान्यवर कंपन्या विद्यार्थ्यांना नोकºया देण्यास उत्सुक आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
आयआयटी मद्रासच्या यंदाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी नोंदणी करणाºया कंपन्यांत १५ टक्के कंपन्या येथील प्लेसमेंट प्रक्रियेत पहिल्यांदाच सहभागी होत आहेत. पहिल्यांदाच कॅम्पसमध्ये येत असलेल्या अन्य कंपन्यांत यूबीएस एजी, नॅसडॅक स्टॉक मार्केट, अलवरेज अँड मार्सल इंडिया, कंट्री गार्डन, हलमा इंडिया, रुब्रिक आणि सेकिसुई केमिकल्स यांचा समावेश आहे.
यंदा कॅम्पसमध्ये सहभागी कंपन्यांची संख्याही वाढली आहे.
४०० पेक्षा जास्त जॉब प्रोफाइल्ससाठी यंदा २७० कंपन्यांनी कॅम्पससाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१६-१७ मध्ये एवढ्याच जॉब प्रोफाइलसाठी २५० कंपन्यांनी नोंदणी केली होती. २०१७-१८ च्या प्लेसमेंट प्रक्रियेचा पहिला टप्पा
१ ते १० डिसेंबर या काळात होईल. यात ५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा विश्राम असेल.
नोंदणी करणाºया ४३ टक्के कंपन्या इंजिनीअरिंग आणि आर अ‍ॅण्ड डी क्षेत्रातील आहेत. २५ टक्के कंपन्या वित्त, विश्लेषण, सल्ला क्षेत्रातील, तर ३२ टक्के कंपन्या आयटी क्षेत्रातील आहेत. ५० स्टार्टअप कंपन्यांचाही त्यात समावेश आहे.
नोकर भरतीसाठी नेहमीच्या कंपन्याही येत आहेतच. मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग आर अ‍ॅण्ड डी, गोल्डमॅन
सॉस, एटॉन, स्क्लुम्बर्गर, महिंद्रा, इंटेल, बजाज, ईएक्सएल, सिटी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो यांचा त्यात समावेश आहे. १९ कंपन्यांनी आंतरराष्टÑीय प्रोफाइल्सची आधीच जाहिरात केली आहे. त्यातील बहुतांश प्रोफाइल्स जपान, सिंगापूर आणि तैवान या आशियाई देशांसह अमेरिकेतील आहेत. (वृत्तसंस्था)
>प्लेसमेंट प्रस्ताव वाढले
संस्थेच्या प्री-प्लेसमेंट प्रस्तावात
(पीपीओ) यंदा ५६ टक्के वाढ झाली आहे. इंटर्नशिप्सकडून हे प्रस्ताव आले आहेत. यंदा एकूण ११४ पीपीओ आले. गेल्या वर्षी ही संख्या ७३ होती. संस्थेचे प्रशिक्षण आणि भरती विभागाचे सल्लागार मनू संथानम यांनी सांगितले की, कंपन्यांना कॅम्पसमध्ये आणण्यासाठी आमच्या विद्यार्थी व कर्मचाºयांच्या समितीने खूप प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हे प्लेसमेंट सत्र चांगले दिसत आहे.

Web Title: Apple, Nasdaq, Aadhaar Authority will also participate in IITs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.