Join us  

Apple News: कोण आहेत भारतीय वंशाचे सीएफओ केवन पारेख? थेट टीम कुक यांना करतात रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 1:50 PM

Apple News: केवन पारेख यांच्याकडे अ‍ॅपलचे नवे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जाणून घ्या कोण आहेत पारेख आणि कसा होता त्यांचा प्रवास.

Apple News: केवन पारेख यांच्याकडे अ‍ॅपलचे नवे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढील वर्षी जानेवारी २०२५ पासून ते आपला कार्यभार स्वीकारतील. भारतीय वंशाचे केवन जानेवारीपासून लुका मॅस्त्री (Luca Maestri) यांची जागा घेतील आणि एक्झिक्युटिव्ह टीममध्ये सामील होतील. सध्या ते कंपनीचे उपाध्यक्ष (फायनान्शियल प्लॅनिंग अँड अ‍ॅनालिसिस) आहेत. 

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी २७ ऑगस्ट रोजी दिलेल्या माहितीनुसार ते अ‍ॅपलच्या फायनान्स लीडरशिप टीममध्ये दहा वर्षांहून अधिक काळ आहेत. तसंच त्यांना कंपनीबद्दल सर्व प्रकारची माहिती आहे. अ‍ॅपलच्या पुढील सीएफओपदासाठी ते सर्वोत्तम पर्याय असल्याचंही टीम कुक यांनी म्हटलंय.

कोण आहेत केवन पारेख?

थॉमसन रॉयटर्ससाठी चार वर्षे काम केल्यानंतर सुमारे ११ वर्षांपूर्वी केवन पारेख यांनी अ‍ॅपल ही कंपनी जॉईन केली होती. थॉमसन रॉयटर्सच्या आधी त्यांनी जनरल मोटर्समध्ये पाच वर्षे सेवा बजावली. केवन पारेख यांनी शिकागो विद्यापीठातून एमबीए केलं असून मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे. अ‍ॅपलमधील त्यांच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मार्केटिंग, इंटरनेट सेल्स अँड सर्व्हिसेस आणि इंजिनीअरिंग टीमपासून सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी ग्लोबल सेल्स, रिटेल आणि मार्केटिंग फायनान्स सारख्या जबाबदाऱ्या हाताळल्या आणि आता फायनान्शियल प्लॅनिंग अँड अॅनालिसिस, जी अँड ए अँड फायनान्स, इन्व्हेस्टर रिलेशन्स आणि मार्केट रिसर्चची जबाबदारी सांभाळली आहे. महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये ते थेट टिक कुकला यांना रिपोर्ट करतात.

टॅग्स :अॅपल