Lokmat Money > बिझनेस न्यूज > Made In India निर्यातीत Apple झाला 'किंग'; Samsung ला मागे टाकत बनला नंबर-१

Made In India निर्यातीत Apple झाला 'किंग'; Samsung ला मागे टाकत बनला नंबर-१

Apple vs Samsung: गेल्या तिमाहीत अ‍ॅपलने भारतातून निर्यातीच्या व्यापारात चांगलाच जम बसवला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 01:29 PM2023-09-26T13:29:27+5:302023-09-26T13:49:43+5:30

Apple vs Samsung: गेल्या तिमाहीत अ‍ॅपलने भारतातून निर्यातीच्या व्यापारात चांगलाच जम बसवला आहे

apple overtakes samsung in made in india iphone export 49 percent | Made In India निर्यातीत Apple झाला 'किंग'; Samsung ला मागे टाकत बनला नंबर-१

Made In India निर्यातीत Apple झाला 'किंग'; Samsung ला मागे टाकत बनला नंबर-१

Apple vs Samsung: अ‍ॅपल भारतात सातत्याने गुंतवणूक करत आहे. अ‍ॅपल चीनवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत अ‍ॅपलने गेल्या काही वर्षांपासून भारतात आयफोन बनवण्यास सुरुवात केली आहे. अ‍ॅपल व्यतिरिक्त सॅमसंगसारखे ब्रँड भारतात त्यांचे स्मार्टफोन तयार करतात. पण भारतात बनवलेले आयफोन जगाला पुरवणारा अ‍ॅपल आता नंबर-1 ब्रँड बनला आहे.

सॅमसंगला टाकलं मागे-

अहवालानुसार, गेल्या जून तिमाहीत मेड इन इंडिया मोबाईल निर्यातीत Apple ब्रँड अव्वल राहिला आहे. भारतातून स्मार्टफोन निर्यातीच्या बाबतीत अ‍ॅपलने पहिल्यांदाच सॅमसंगला मागे टाकले आहे. ऍपलने जूनच्या तिमाहीत देशातील एकूण 12 दशलक्ष शिपमेंटपैकी 49 टक्के शिपमेंट केले, तर सॅमसंगचा वाटा केवळ 45 टक्के होता.

भारतात अधिक गुंतवणूक का?

अ‍ॅपल भारतात आयफोन निर्मितीमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे. यासाठी अ‍ॅपल भारताला सर्वोत्तम बाजारपेठ मानत आहे. यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, भारतात स्मार्टफोन बनवणे स्वस्त आहे. तसेच, भारत सरकार स्थानिक पातळीवर स्मार्टफोन बनवण्यासाठी अनेक सवलती देत ​​आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत ही स्वत: स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ आहे.

अशाप्रकारे उत्पादन सुरू झाले-

अ‍ॅपलने 2017 मध्ये भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले. Apple भारतात iPhone SE ची निर्मिती करणारी पहिली कंपनी होती. ते 2022 पासून iPhone 14 चे जुने मॉडेल तयार करत आहे. पण यावेळी कंपनी नवीनतम लॉन्च केलेल्या iPhone 15 सीरीज, iPhone 15 आणि iPhone 15 Plus चे बेस व्हेरियंट तयार करत आहे. तसेच, मेड इन इंडिया iPhone 15 विक्रीच्या पहिल्या दिवसापासून विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Web Title: apple overtakes samsung in made in india iphone export 49 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.