Lokmat Money > बिझनेस न्यूज > Apple चीनमधून उर्वरित व्यवसायही गुंडाळण्याच्या तयारीत, तयारी सुरू; 'हा' आहे संपूर्ण प्लॅन

Apple चीनमधून उर्वरित व्यवसायही गुंडाळण्याच्या तयारीत, तयारी सुरू; 'हा' आहे संपूर्ण प्लॅन

व्यवसायाच्या दृष्टीनं चीनला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. एकेकाळी चीन स्मार्टफोनचं मोठं मार्केट होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 07:45 PM2023-04-30T19:45:09+5:302023-04-30T19:45:35+5:30

व्यवसायाच्या दृष्टीनं चीनला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. एकेकाळी चीन स्मार्टफोनचं मोठं मार्केट होतं.

Apple prepares to get out off remaining business from China Here is the whole plan know details | Apple चीनमधून उर्वरित व्यवसायही गुंडाळण्याच्या तयारीत, तयारी सुरू; 'हा' आहे संपूर्ण प्लॅन

Apple चीनमधून उर्वरित व्यवसायही गुंडाळण्याच्या तयारीत, तयारी सुरू; 'हा' आहे संपूर्ण प्लॅन

Apple iPhone manufacturing: सध्या चीनचे दिवस वाईट सुरू आहेत असंच म्हणावं लागेल. व्यवसायाच्या दृष्टीनं चीनला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. एकेकाळी चीन स्मार्टफोनचं मोठं मार्केट होतं. परंतु वर्षभरापूर्वीपासून चीनमधून मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय दुसरीकडे जाऊ लागला आहे. सोबतच स्मार्टफोनच्या विक्रीतही यावर्षी मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

ॲपल चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आयफोन तयार करत असे. पण अॅपलनं गेल्या वर्षभरात चीनमधून बराच व्यवसाय दुसरीकडे हलवला आहे. तसंच उर्वरित व्यवसाय लवकरच इतर देशांमध्ये स्थलांतरित करण्याचा विचार आहे. खरं तर, अॅपल चीनच्या तुलनेत आयफोन बनवण्यासाठी कमी खर्च असलेल्या देशांमध्ये आपले उत्पादन युनिट स्थापन करत आहे. यामध्ये कामगार खर्च आणि कच्च्या मालाची उपलब्धता समाविष्ट आहे. तसंच नवीन कारखाना सुरू करण्याचे नियम लवचिक असावेत. याशिवाय कारखाना उभारण्याचा खर्च स्वस्त हवा. ॲपल आपला आगामी आयफोन अशा देशांमध्ये बनवण्याच्या विचारात आहे. ॲपल यासाठी व्हिएतनाम आणि भारताकडे पर्याय म्हणून पाहत आहे.

३० टक्के उत्पादन शिफ्ट करणार
मॅकबुक्सच्या निर्मितीसाठी ॲपल येत्या महिन्यात व्हिएतनामशी करार करू शकतं, असं वृत्त आहे. रिपोर्टनुसार २०२५ पर्यंत ॲपल चीनमधून ३० टक्के उत्पादन स्थलांतरित करेल. ॲपलने भारतात गुंतवणूक वाढवली आहे. या अंतर्गत कंपनी चेन्नईत तसंच कर्नाटक आणि तेलंगणमध्ये नवीन प्लांट उभारत आहे. अहवालानुसार, २०२८ पर्यंत आयफोनचं ३० ते ३५ टक्के उत्पादन चीनच्या बाहेर असेल.

Web Title: Apple prepares to get out off remaining business from China Here is the whole plan know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.