वॉशिंग्टन : सॅमसंग विरोधातील डिझाईन पेटंटचा भंग केल्याबद्दलचा दावा अॅपलने आता अमेरिकी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. आपल्या आयफोनचे डिझाईन सॅमसंगने चोरल्याचा आरोप अॅपलने केला आहे. डिझाईन चोरीमुळे अॅपलला किती आर्थिक नुकसान झाले, याची सुनावणी न्यायालय घेणार आहे.
पेटंट कायद्यांतर्गत डिझाईन चोरीचा कोणत्याही प्रकारचा खटला अमेरिकेत गेल्या १00 वर्षांत दाखल झालेला नाही. त्यामुळे या खटल्याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
हा दावा अनेक महिने चालेल असे मानले जात आहे. फेडरल सर्किटच्या अपील कोर्टाने अॅपलचा ४00 दशलक्ष डॉलरचा दावा याआधी मान्य केला आहे. सॅमसंगने अॅपलच्या आयफोनचे फ्रन्ट स्क्रीन आणि ग्राफिकल टचस्क्रीन डिझाईन चोरल्याचे न्यायालयाने मान्य केले होते.
अॅपल ही अमेरिकीतील कॅलिफोर्निया येथील कंपनी असून, सॅमसंग ही दक्षिण कोरियाची कंपनी आहे. आयफोनच्या डिझाईनचे पेटंट अॅपलने घेऊन ठेवलेले आहे.
सॅमसंगने अॅपलच्या दाव्याला आव्हान दिले आहे. विशिष्ट डिझाईनची कॉपी केल्यामुळे नेमके किती नुकसान झाले, हे कसे ठरविणार यावर सॅमसंगने वाद उभा केला आहे. सध्या अशा वस्तूपोटी मिळणाऱ्या एकूण नफ्यावरून नुकसान काढले जाते. हा नियम १८८७ साली बनविण्यात आला होता. त्यात १९५२मध्ये सुधारणा करण्यात आली होती. विकलेल्या स्मार्टफोनवरील संपूर्ण नफ्यावरून नव्हे, तर नफ्याच्या काही हिश्शावरून नुकसानीचा
आकडा काढावा, असे सॅमसंगचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
सॅमसंगकडून नोट-७चे उत्पादन, विक्री पूर्णपणे बंद
च्सेऊल : दक्षिण कोरियाची जगप्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने आपल्या गॅलॅक्सी नोट-७ या स्मार्टफोनचे उत्पादन आणि विक्री पूर्णत: बंद केली आहे. याशिवाय ग्राहकांनाही या फोनचा वापर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या फोनच्या बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना घडत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
च्सूत्रांनी सांगितले की, बॅटरीमुळे आग लागण्याच्या घटना समोर आल्यानंतर कंपनीने विकलेले स्मार्टफोन परत घेऊन ग्राहकांना नवे फोन दिले होते.
च्तथापि, या नव्या फोनमध्येही आग लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कंपनीने हा फोन कायमचाच बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. अमेरिकेतील फेडरल ग्राहक नियामकांनी या फोन प्रकरणी संभाव्य धोक्याची सूचना जारी केली आहे.
अॅपल-सॅमसंग लढाई सर्वोच्च न्यायालयात
सॅमसंग विरोधातील डिझाईन पेटंटचा भंग केल्याबद्दलचा दावा अॅपलने आता अमेरिकी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. आपल्या आयफोनचे डिझाईन
By admin | Published: October 12, 2016 06:08 AM2016-10-12T06:08:15+5:302016-10-12T06:08:15+5:30