Lokmat Money > बिझनेस न्यूज > कधीकाळी अ‍ॅपलने भारताकडे केलं होतं दुर्लक्ष; आता सर्वाधिक कमावतेय नफा; कसा झाला बदल?

कधीकाळी अ‍ॅपलने भारताकडे केलं होतं दुर्लक्ष; आता सर्वाधिक कमावतेय नफा; कसा झाला बदल?

Apple Products Selling : एकेकाळी भारतीय बाजारपेठेकडे कानाडोळा करणारी अ‍ॅपल कंपनी आता पूर्णपणे भारतीय मार्केटमध्ये घुसली आहे. दुसरीकडे चीनमध्ये कंपनीला मोठा फटका बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:07 PM2024-11-05T15:07:53+5:302024-11-05T15:09:19+5:30

Apple Products Selling : एकेकाळी भारतीय बाजारपेठेकडे कानाडोळा करणारी अ‍ॅपल कंपनी आता पूर्णपणे भारतीय मार्केटमध्ये घुसली आहे. दुसरीकडे चीनमध्ये कंपनीला मोठा फटका बसला आहे.

apple selling more in india than china in q3 july september 2024 | कधीकाळी अ‍ॅपलने भारताकडे केलं होतं दुर्लक्ष; आता सर्वाधिक कमावतेय नफा; कसा झाला बदल?

कधीकाळी अ‍ॅपलने भारताकडे केलं होतं दुर्लक्ष; आता सर्वाधिक कमावतेय नफा; कसा झाला बदल?

Apple Products Selling : अ‍ॅपलच्या आयफोनची भारतीयांमध्ये किती क्रेझ आहे? हे नव्याने सांगायला नको. सप्टेंबर महिन्यात आयफोन १६ लाँच झाल्यानंतर अनेक अ‍ॅपल स्टोअरमध्ये तुफान गर्दी झाली होती. आयफोनचं नाही तर कंपनीची इतर उत्पादने आज जवळपास प्रत्येक घराची शान बनली आहेत. पण, एक काळ असा होता की ही अमेरिकन कंपनी भारतात येण्यास टाळाटाळ करत होती. पण आज भारतीय बाजारपेठ अ‍ॅपलसाठी खूप खास बनली आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या महसुलात भारतीय बाजारपेठेचाही मोठा वाटा आहे.

एकेकाळी चीनची बाजारपेठ अ‍ॅपलसाठी सर्वोत्तम होती. पण आता काळ बदलला आहे. अ‍ॅपलला २०२४ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत चीनमध्ये झटका बसला आहे. मात्र, दुसरीकडे भारतीय बाजारपेठेने भरभरुन नफा मिळवून दिला आहे. चीनमधील अ‍ॅपलच्या विक्रीत घट झाली असताना भारतातील विक्री ५०% पेक्षा जास्त वाढली आहे.

कंपनीची भारतातील उत्कृष्ट कामगिरी
जुलै-सप्टेंबर तिमाहीतील निकाल हे अ‍ॅप्पलचे भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्तम निकाल आहेत. चीनमधील अ‍ॅपलची विक्री गेल्या तिमाहीत ४२९ कोटी रुपयांनी घसरून १.२७ लाख कोटी रुपयांवर आली आहे. म्हणजेच त्यात ०.३४% ने घट झाली. तर कंपनीची भारतातील विक्री १२,६१६ कोटी रुपयांवरून ३३,६४४ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या तिमाहीत अ‍ॅप्पलने देशात २१,०२७ कोटी रुपयांची विक्री केली होती. म्हणजेच त्यात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

चीनमध्ये विक्री का कमी झाली?
एकेकाळी चीन ही अ‍ॅपलची आवडती बाजारपेठ होती. कंपनीचे फोन आणि इतर उत्पादने बहुतेक चीनमध्ये विकली गेली. पण आता काळ बदलला आहे. वर्षभरापूर्वी चीनमध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ब्रँड असलेला iPhone आता टॉप-५ मधून बाहेर पडला आहे. याची अनेक कारणे आहेत:

  • चीन सरकारने अ‍ॅपल आयफोनचा वापर मोठ्या प्रमाणात मर्यादित केला आहे. सरकारी कामात आयफोन वापरण्यास सरकारने बंदी घातली आहे. 
  • व्हिओ, ओप्पो, हुवाई आणि शाओमी यांसारख्या स्थानिक ब्रँड्सने अ‍ॅपलसमोर मोठं आव्हान उभं केलंय.
  • चिनी बाजारपेठ आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे अ‍ॅपलमध्ये विक्रीत वाढ होण्यास फारसा वाव नाही.

अ‍ॅपलला भारत का आवडला?
अ‍ॅपलने २००७ मध्ये आपले स्मार्टफोन विकण्यास सुरुवात केली. पुढच्याच वर्षी म्हणजे २००८ मध्ये अ‍ॅप्पलने चीनमध्ये पहिले स्टोअर उघडले. त्यावेळी कंपनीला भारतात आपले भविष्य दिसत नव्हते. २०१७ मध्ये चीनने भारतात प्रवेश केला. त्यावेळी अ‍ॅपलला भारतात संधी दिसू लागली. भारतात आयफोनची विक्री वाढू लागली. २०१७ मध्ये अ‍ॅपलने चेन्नईमध्ये आपले पहिले उत्पादन युनिट सुरू केले.

चीनमध्ये वाढती स्पर्धा पाहून कंपनीने आपला मोर्चा भारताकडे वळवला. इथे आयफोनची वाढती लोकप्रियता पाहून कंपनीने २०२३ मध्ये मुंबईत पहिले स्टोअर उघडले. काही काळानंतर दिल्लीतही दुसरे स्टोअर सुरू झाले. कंपनी आणखी काही स्टोअर्स उघडण्याचा विचार करत आहे. ३ कंपन्या भारतात आयफोन असेंबल करतात. यामध्ये तैवानचा फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप, पेगाट्रॉन कॉर्प आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. चेन्नईच्या बाहेरील भागात असलेले फॉक्सकॉनचे स्थानिक युनिट हे भारतातील सर्वोच्च पुरवठादार आहे.

Web Title: apple selling more in india than china in q3 july september 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.