Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनला Apple चा ‘जोर का झटका’, आता टाटा तयार करणार iPhone; प्रत्येक चौथा प्रोडक्ट असेल 'मेड इन इंडिया' 

चीनला Apple चा ‘जोर का झटका’, आता टाटा तयार करणार iPhone; प्रत्येक चौथा प्रोडक्ट असेल 'मेड इन इंडिया' 

सध्या अॅपलच्या अनेक प्रोडक्ट्सचं उत्पादन चीनमध्ये होतं. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:30 PM2022-09-22T16:30:32+5:302022-09-22T16:31:57+5:30

सध्या अॅपलच्या अनेक प्रोडक्ट्सचं उत्पादन चीनमध्ये होतं. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

apple shift manufacturing unit from china tata group manufacture iphone every fourth apple product will be made in india ratan tata | चीनला Apple चा ‘जोर का झटका’, आता टाटा तयार करणार iPhone; प्रत्येक चौथा प्रोडक्ट असेल 'मेड इन इंडिया' 

चीनला Apple चा ‘जोर का झटका’, आता टाटा तयार करणार iPhone; प्रत्येक चौथा प्रोडक्ट असेल 'मेड इन इंडिया' 

भारतात स्मार्ट फोन मार्केट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगातील दिग्गज टेक कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. अशात भारतीय बाजारपेठ या कंपन्यांसाठी उत्तम ठरत आहे. भारतात वाढणाऱ्या स्मार्टफोन बाजारात आता टाटा देखील एन्ट्री करणार आहे. या प्रकरणी आयफोन तयार करणारी करणारी कंपनी Wistron Corp शी चर्चा सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा समूह तैवानच्या कंपनीचं अधिग्रहण करून iPhone चं उत्पादन सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही निर्बंध लागू आहेत. त्यामुळे अॅपलला मोठं नुकसानही सोसावं लागत आहे. याच कारणामुळे अॅपल चीनमधून आपला व्यवसाय हलवण्याच्या तयारीत आहे. भारत हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमधून भारतात दरवर्षी जवळपास 3,70,00 आयफोन शिपमेंट करते. 2022 मध्ये ही 5,70,000 युनिटपर्यंत जाऊ शकते.

2025 पर्यंत 25 टक्के अॅपलच्या प्रोडक्टचं भारतात उत्पादन होईल. जेपी मॉर्गनच्या रिपोर्टनुसार 2025 पर्यंत 25 टक्के आयफोनचं उत्पादनही भारतात सुरू होईल. पुढील तीन वर्षांमध्ये जगभरात विक्री होणारा प्रत्येक चौथा अॅपल प्रोडक्ट मेड इन इंडिया असेल.

Web Title: apple shift manufacturing unit from china tata group manufacture iphone every fourth apple product will be made in india ratan tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.