Lokmat Money > बिझनेस न्यूज > Apple चा चीनला पुन्हा दे धक्का! आयफोननंतर आणखी एक प्लांट भारतात येणार; पुण्यात बनणार हे प्रॉडक्ट

Apple चा चीनला पुन्हा दे धक्का! आयफोननंतर आणखी एक प्लांट भारतात येणार; पुण्यात बनणार हे प्रॉडक्ट

Apple AirPods India Manufacturing : Apple भारतात आपले उत्पादन क्षमता वाढवत आहे. आता कंपनी भारतात एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 09:56 AM2024-10-03T09:56:19+5:302024-10-03T10:15:46+5:30

Apple AirPods India Manufacturing : Apple भारतात आपले उत्पादन क्षमता वाढवत आहे. आता कंपनी भारतात एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करणार आहे.

apple to manufacture airpods in india following iphone success | Apple चा चीनला पुन्हा दे धक्का! आयफोननंतर आणखी एक प्लांट भारतात येणार; पुण्यात बनणार हे प्रॉडक्ट

Apple चा चीनला पुन्हा दे धक्का! आयफोननंतर आणखी एक प्लांट भारतात येणार; पुण्यात बनणार हे प्रॉडक्ट

Apple AirPods : आयफोनची निर्मिती करणाऱ्या अ‍ॅपलचा भारतावरील विश्वास सातत्याने वाढत आहे. अ‍ॅपलने काही वर्षांपूर्वी चीनला दे धक्का देत आयफोन उत्पादन प्रकल्प भारतात स्थलांतरित केला होता. त्यामुळे आयफोन १६ च्या रुपाने पहिला मेड इन इंडिया फोन भारतीयांना वापरायला मिळाला. आयफोनचा प्लांट यशस्वी चालल्यानंतर अ‍ॅपल आता आणखी एका प्रॉडक्टची निर्मिती भारतात करणार आहे. लवकरच एअरपॉड्स (AirPods) निर्मितीचा प्रकल्पही भारतात येऊ शकतो. एअरपॉड्स सारख्या उपकरणांसाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (Production Linked Incentive Scheme) योजना नसताना हा प्रकल्प भारतात सुरू होणार आहे. ही योजना स्मार्टफोनसाठी दिली जाते.

पुण्यात होणार उत्पादन
Apple पहिल्यांदा अमेरिकन कॉन्ट्रॅक्ट उत्पादक जेबिलच्या (Jabil) पुण्यातील प्लांटमध्ये एअरपॉड्स केसिंगचे उत्पादन सुरू करणार आहे. त्यानंतर तेलंगणामधील फॉक्सकॉनच्या नवीन युनिटमध्ये एअरपॉड्सचे उत्पादन सुरू केले जाईल. यापूर्वी २०२१ मध्ये अ‍ॅपलने भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केलं आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने सुमारे १४ अब्ज डॉलर किमतीच्या आयफोनची निर्यात केली. हे जगातील उत्पादनाच्या १४ टक्के आहे.

भारतात वाढतंय आयफोनचे उत्पादन
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, Apple भारतात आयफोनचे उत्पादन वेगाने वाढवत आहे. या वर्षापासून प्रो सीरीजचे उत्पादनही सुरू केले आहे. हे काम फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि टाटा समूहासारख्या कंत्राटी उत्पादकांसोबत केले जात आहे. टाटाने नुकतेच विस्ट्रॉनच्या भारतीय युनिटचे कामकाज हाती घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरपॉड्सचे उत्पादन पुढील वर्षापासून सुरू होईल. हे उत्पादन भारतातही विकले जाणार आहेत. त्यामुळे आयफोननंतर आता एअरपॉड्सही मेड इन इंडिया मिळणार आहे. अमेरिकेची अ‍ॅपल कंपनी चीनवरील आपलं अवलंबित्व कमी करण्यासाठी काम करत आहे. यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये उत्पादन सुरू करत असल्याची माहिती आहे.

MacBooks निर्मितीची योजना नाही
अ‍ॅपलचा हा निर्णय भारतासाठी गूड न्यूज आहे. कारण देशाच्या निर्यात बास्केटमध्ये त्यांच्या प्रीमियम उत्पादनांचा मोठा वाटा आहे. Apple ची सध्या भारतात मॅकबुक्स तयार करण्याची कोणतीही योजना नाही. सरकार PLI योजनेअंतर्गत लॅपटॉप उत्पादकांना भारतात उत्पादन करण्यास प्रोत्साहित करत आहे.

Web Title: apple to manufacture airpods in india following iphone success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.