Apple Event: गेल्या महिन्यात Apple ने एका मेगा इव्हेंटमध्ये iPhone 15 सीरिज लॉन्च केली. यानंतर आता कंपनीने 31 ऑक्टोबर रोजी आणखी एका मोठ्या इव्हेंटची घोषणा केली आहे. Apple ने या इव्हेंटसाठी 'Scary Fast' अशी टॅगलाईन दिली आहे. या इव्हेंटची लाईव्ह स्ट्रीमिंग Apple.com वर केली जाईल. या इव्हेंटमध्ये Apple आपले विविध गॅजेट्स लॉन्च करणार आहे.
Apple Launch Event 2023 Date & Timeहा इव्हेंट 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5PM PT वाजता आहे, जो भारतीय वेळेनुसार 31 ऑक्टोबर सकाळी 5:30AM वर लाईव्ह दिसेल.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, या इव्हेंटमध्ये कंपनीने नवीन iMac आणि MacBook Pro लॉन्च करण्याची योजना आखली आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सध्या iMac आणि MacBook Pros ची सप्लाय ऑनलाइन आणि रिटेल स्टोअरवर कमी होत आहे. त्यामुळे कंपनीला लवकरात लवकर नवीन लॅपटॉप लॉन्च करायचे आहेत.
नवीन प्रोसेसर मिळणार?Apple ने 2021 मध्ये 24-इंच iMac लॉन्च केला होता, ज्यात नवीन डिझाईन आणि M1 चिप होती. आता दोन वर्षांनंतर कंपनी iMac चे अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या इव्हेंटमध्ये Apple M3 प्रोसेसरदेखील लॉन्च केले जाऊ शकते.