Join us  

Online Voter ID Card : आता घरबसल्या बनणार व्होटर आयडी कार्ड, पाहा कसा करू शकता अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 3:24 PM

देश सातत्यानं तंत्रज्ञानात प्रगती करत आहे. आजकाल अनेक कामं सहजरित्या ऑनलाइन पद्धतीनं करता येतात.

देश सातत्यानं तंत्रज्ञानात प्रगती करत आहे. आजकाल अनेक कामं सहजरित्या ऑनलाइन पद्धतीनं करता येतात. अनेक सरकारी कामं आता घसबसल्या करणंही शक्य झालंय. पहिले अशी अनेक कामं होती, ज्यासाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता ही कामं ऑनलाइन सुरू झाल्यानं चकराही माराव्या लागत नाही आणि वेळही वाचते.आता तुम्ही घसबरल्या व्होटर आयडीही तयार करू शकता. यापूर्वी या कामासाठी अनेकदा सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता आता ऑनलाइन व्होटर आयडी कार्ड (Online Voter ID Card) बनवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि कोणत्याही वेळी व्होटर आयडी बनवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.कसं बनवाल ऑनलाइन व्होटर आयडी?

  • ऑनलाइन व्होटर आयडी बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला National Voters Services Portal वर क्लिक करावं लागेल.
  • यावर क्लिक केल्यानंतर नवं पेज ओपन होईल. यावर Apply online for registration of new voter वर क्लिक करावं लागेल.
  • तुमच्यासमोर आता एक नवा फॉर्म ओपन होईल.
  • या ठिकाणी तुमच्याकडे मागितलेली सर्व माहिती आणि दस्तऐवज अपलोड करा.
  • सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म जमा होईल.
  • सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडीवर तुम्हाला सरकारकडून एक लिंक पाठवली जाईल. ज्याद्वारे तुम्ही व्होटर आयडीचं स्टेटस चेक करू शकता.
  • १० ते १२ दिवस किंवा महिन्याभरासाठी तुम्हाला व्होटर आयडीसाठी वाट पाहावी लागेल.
  • या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन व्होटर आयडी बनवण्यासाठी अर्ज करू शकता. 

 

टॅग्स :ऑनलाइन