Join us

घरबसल्या मिनिटांत करा Voter ID Card साठी अर्ज, कशी कराल त्यातील चूक दुरुस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 3:34 PM

तुमचं वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी घरी बसून तुमच्या मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. यासाठी

Voter ID Card: तुमचं वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी घरी बसून तुमच्या मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रं ऑनलाइन अपलोड करावी लागतील. यासाठी आता तुम्हाला कार्यालयात जाऊन तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. यासोबतच, तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रात कोणताही बदल करायचा असेल, तर ठराविक प्रक्रियेचं पालन करून तुम्ही घरबसल्या तो बदलही करू शकता.

मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रं 

पासपोर्ट साईजचे दोन फोटोपत्त्याचा पुरावाबँक पासबुकची प्रतरेशन कार्डपासपोर्टड्रायव्हिंग लायसन्सरेंट अॅग्रीमेंटवीज बिलपाणी, टेलिफोन आणि गॅस बिल इ.एज सर्टिफिकेटआधार कार्डपॅन कार्ड 

जर तुम्ही घरबसल्या सर्व कागदपत्रं अपलोड करत असाल तर प्रथम तुमची सर्व कागदपत्र पीडीएफ किंवा JPG फॉरमॅटमध्ये कनव्हर्ट करा. कारण पीडीएफ किंवा जेपीजी फॉरमॅटमधील कागदपत्रेच त्या ठिकाणी अपलोड करता येतील. 

कोण करू शकतं अर्ज? 

  • अर्जदार भारतीय नागरिक असण आवश्यक आहे.
  • अर्जदाराचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावं.
  • अर्जदाराचा भारतात स्थायी पत्ता असणं आवश्यक आहे.  

असा करू शकता अर्ज 

  • सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल www.nvsp.in वर जावं लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर फॉर्म-८ उघडेल.
  • तेथे तुमचे सर्व तपशील एन्टर करा.
  • यानंतर आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
  • तुम्हाला तुमच्या फोनवर कन्फर्मेशन मिळेल.
  • येत्या १५ ते २० दिवसांत मतदार कार्ड तुमच्या घरी पोहोचेल. 

असा बदलू शकता फोटो 

सर्व प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://www.nvsp.in/ वर जा. येथे तुम्हाला Correction In Voter ID चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही फोटोमध्ये बदल करू शकता.

टॅग्स :मतदाननिवडणूक