ठाणे - कोरोना विषाणूच्या वाढ्त्या संसर्गामुळे सध्या आयोग्य यंत्रणेवर ताण आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेमध्ये परिचारिकांच्या पदासाठी भरती निघाली आहे. जर तुम्ही नर्सिंगचे शिक्षण घेतलेले असेल आणि या पदासाठी आवश्यक पात्रता असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता.
ठाणे महानगरपालिकेतील नर्सच्या (जीएनएम आणि एएनएम) या पदांसाठी भरती होणार आहे. एकूण १८३० पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. जीएनएम/बीएएसीची पदवी, नर्सिंगची पदवी, एएनएममधील पदवी आणि दोन ते तीन वर्षांच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. भरतीसाठीची वयोमर्यादा ही नियमानुसार आहे. तसेच या पदांसाठीची वेतनश्रेणी ही ३५ ते ४० हजार एवढी आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये पात्र उमेदवारांची निवड ही शॉर्ट लिस्टिंग,लेखी परीक्षा आणि मुलाखतींच्या आधारावर होणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १४ जुलै २०२० पासून सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची तारीख ही २८ जुला २०२० आहे. या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागेल. त्यासाठी https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html वर नोंदणी करावी आणि https://est.tmconline.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. या भरतीसाठीची अधिक माहिती ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी