Join us

२0१६मध्ये नियुक्त्यांत १५ टक्के वाढ होणार

By admin | Published: May 25, 2016 3:50 AM

चालू आर्थिक वर्षात कंपन्यांच्या नियुक्त्यांत १५ टक्के वाढ होण्याची शक्यता एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात कंपन्यांच्या नियुक्त्यांत १५ टक्के वाढ होण्याची शक्यता एका सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४३ टक्के कंपन्यांनी आपण विभिन्न क्षेत्रांत विस्तार करीत असल्याचे नमूद केले आहे. तसेच या विस्तारासाठी कंपन्या आपले मनुष्यबळही वाढवीत आहेत. जिनियस कन्सल्टंट या संस्थेने हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाचा अहवाल ‘हायरिंग, अ‍ॅटरिंग अ‍ॅण्ड कॉम्पेनसेशन ट्रेंड २0१६-१७’ या नावाने प्रसिद्धीस देण्यात आला आहे. अहवालात नमूद माहितीनुसार, या आर्थिक वर्षात चार-आठ वर्षे अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक चांगल्या संधी असल्याचे मत ४४.२५ टक्के व्यावसायिक संघटनांना वाटते. जिनियस कन्सल्टंटचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आर.पी. यादव यांनी सांगितले की, सध्याचे वातावरण सर्वच प्रकारच्या नियुक्त्यांसाठी चांगले असल्याचे दिसून येत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४५.१३ टक्के उत्तरदात्यांना असे वाटते की, नव्या नियुक्त्या आणि अनुभवी कर्मचारी या दोघांसाठीही हे वर्ष चांगले राहील.