Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५५१ कोटींच्या एफडीआयला मंजुरी

५५१ कोटींच्या एफडीआयला मंजुरी

परकीय गुंतवणूक संवर्धन मंडळ अर्थात एरआयपीबीने थेट परदेशी गुंतवणूकीच्या ५५१ कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना मंजूरी दिली

By admin | Published: July 4, 2014 05:56 AM2014-07-04T05:56:27+5:302014-07-04T05:56:27+5:30

परकीय गुंतवणूक संवर्धन मंडळ अर्थात एरआयपीबीने थेट परदेशी गुंतवणूकीच्या ५५१ कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना मंजूरी दिली

Approves FDI of 551 crores | ५५१ कोटींच्या एफडीआयला मंजुरी

५५१ कोटींच्या एफडीआयला मंजुरी

नवी दिल्ली : परकीय गुंतवणूक संवर्धन मंडळ अर्थात एरआयपीबीने थेट परदेशी गुंतवणूकीच्या ५५१ कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना मंजूरी दिली. यात मॉरीशसच्या डेस्टीमनी इंटरप्रायजेसच्या ४८९.९९ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे पीएनबी हाऊसिंग फायनान्सचे इक्विटी शेअर अंशत: खरेदी करण्याचा प्रस्तावाचाही समावेश आहे.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय अमरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला आपली मूळ कंपनी अल्बनी मॉलिक्यूलर रिसर्चमध्ये ५९.९५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मंजूरी मिळाली आहे. अजॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन तथा मोन्सॅटो होल्डिंग्जसह एफडीआयच्या ३१ प्रस्तावांवर शुक्रवारी विचार होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Approves FDI of 551 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.