नवी दिल्ली : २0१८-१९ या वित्त वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत भारताची थेट परकीय गुंतवणूक तब्बल ११ टक्क्यांनी घसरून २२.६६ अब्ज डॉलरवर आली आहे.
सन २0१७-१८ वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या काळात २५.३५ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूकभारताला मिळाली. थेट परकीय गुंतवणुकीचा लाभ मिळालेल्या क्षेत्रांत सेवा क्षेत्र (४.९१ अब्ज डॉलर), संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर (२.५४ अब्ज डॉलर), दूरसंचार (२.१७ अब्ज डॉलर), व्यापार (२.१४ अब्ज डॉलर), रसायने (१.६ अब्ज डॉलर) आणि वाहन उद्योग (१.५९ अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे.
सन एप्रिल ते सप्टेंबर २0१८-१९ या काळात ८.६२ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक सिंगापुरातून मिळाली. मॉरिशस (३.८८ अब्ज डॉलर), नेदरलँडस् (२.३१ अब्ज डॉलर), जपान (१.८८ अब्ज डॉलर), अमेरिका (९७0 दशलक्ष डॉलर) आणि ब्रिटन (८४५ दशलक्ष डॉलर) यांचा समावेश आहे.
वृद्धीदर नीचांकी
२0१७-१८ मध्ये एकूण वित्त वर्षात ३ टक्के वृद्धीसह ४४.८५ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक मिळाली होती. हा वृद्धीदर पाच वर्षांचा नीचांकी दर ठरला आहे.
सूत्रांनी सांगितले की, थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी झाल्यामुळे देशाच्या विदेशी चलन साठ्यावर परिणाम होईल. त्याचप्रमाणे रुपयाच्या मूल्यावरही त्याचा परिणाम होईल.
एप्रिल-सप्टेंबरमध्ये एफडीआय तब्बल ११ टक्क्यांनी घसरली
२0१८-१९ या वित्त वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत भारताची थेट परकीय गुंतवणूक तब्बल ११ टक्क्यांनी घसरून २२.६६ अब्ज डॉलरवर आली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:37 AM2019-02-05T05:37:30+5:302019-02-05T05:37:54+5:30