Lokmat Money > बिझनेस न्यूज > Arcelor-Mittal : अर्सेलर मित्तल करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक

Arcelor-Mittal : अर्सेलर मित्तल करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी  महाराष्ट्रात आणखी  ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 08:55 AM2023-04-22T08:55:43+5:302023-04-22T08:56:14+5:30

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी  महाराष्ट्रात आणखी  ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे.

Arcelor-Mittal will invest 80 thousand crores | Arcelor-Mittal : अर्सेलर मित्तल करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक

Arcelor-Mittal : अर्सेलर मित्तल करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई : अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी  महाराष्ट्रात आणखी  ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. याबाबत शुक्रवारी  सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी गुंतवणूक करेल. 
या चर्चेच्या वेळी  महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची कंपनीने इच्छा व्यक्त केली. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी कंपनीने  राज्य सरकारकडे  केली. शिवाय वांद्रे कुर्ला संकुलात कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली. 
 यावर फडणवीस यांनी  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्त्वता मान्यता दिली. 
 

Web Title: Arcelor-Mittal will invest 80 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.