Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘सोन्याचे’ दिवस सरले का? वर्षभराच्या आत मौल्यवान धातूच्या दरांत घसरण

‘सोन्याचे’ दिवस सरले का? वर्षभराच्या आत मौल्यवान धातूच्या दरांत घसरण

वर्षभराच्या आत मौल्यवान धातूच्या दरांत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:27 AM2021-03-12T05:27:15+5:302021-03-12T05:27:23+5:30

वर्षभराच्या आत मौल्यवान धातूच्या दरांत घसरण

Are the 'golden' days over? Decline in precious metal prices throughout the year | ‘सोन्याचे’ दिवस सरले का? वर्षभराच्या आत मौल्यवान धातूच्या दरांत घसरण

‘सोन्याचे’ दिवस सरले का? वर्षभराच्या आत मौल्यवान धातूच्या दरांत घसरण

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना जेव्हा ऐन बहरात होता तेव्हा सर्वच वस्तूंच्या किमती अधोदिशेने जात असताना सोन्याच्या किमतींनी उड्डाण घेतले होते. पार ५६ हजार रुपये तोळा, असा अगडबंब उच्चांकी दर सोन्याने पाहिला आणि सोने घेऊ इच्छिणाऱ्यांची दातखीळ बसली. पण कोरोनाचा बहर जसजसा ओसरू लागला तसतशा सोन्याच्या किमतीही घरंगळू लागल्या. काय कारण असेल, या मागे. जाणून घेऊ या...

तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून दरांत घट होण्याची ५ कारणे...

कोरोनावर प्रभावी लस आल्याने

जागतिक भांडवली बाजारांमध्ये तेजी आल्यामुळे

अमेरिकेत सरकारी बॉण्ड्सना मागणी वाढल्याने

अमेरिकी डॉलर पुन्हा मजबूत झाल्यामुळे

या सगळ्या गोष्टी जुळून आल्याने लोकांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली

समजून घ्या... 
मुळात सोन्याच्या दरांनी उसळी घेतलीच का?

भारतीयांमध्ये 
तर सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. जगात सोन्याला सर्वाधिक मागणी भारतातूनच असते

सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित समजली जाते
कोरोनाकाळात आर्थिक आघाड्यांवर सार्वत्रिक अनिश्चितता होती

सोन्यातील गुंतवणूक आणि मागणी
n सोन्याचे आकर्षण, म्हणून भारतात मागणीही मागणी
nअनेक जण सोन्याचे दागिने करून ठेवतात
nगुंतवणूक म्हणूनही सोने खरेदी केले जाते
nदरवाढीमुळे सोन्याच्या मागणीत घट झाली होती
nआता दर घसरणीमुळे पुन्हा मागणी वाढू लागली आहे

सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्यात गुंतवणुकीची मानसकिता दिसली
साहजिकच सोन्याची मागणी कोरोनाकाळात वाढली

सोने येणार का आणखी खाली?

तज्ज्ञांच्या मते नजीकच्या काळात तरी सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाही, उलटपक्षी येत्या काही काळात सोन्याचे दर ४३ हजार रुपये तोळ्यापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

Web Title: Are the 'golden' days over? Decline in precious metal prices throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं