Join us  

‘सोन्याचे’ दिवस सरले का? वर्षभराच्या आत मौल्यवान धातूच्या दरांत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 5:27 AM

वर्षभराच्या आत मौल्यवान धातूच्या दरांत घसरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोरोना जेव्हा ऐन बहरात होता तेव्हा सर्वच वस्तूंच्या किमती अधोदिशेने जात असताना सोन्याच्या किमतींनी उड्डाण घेतले होते. पार ५६ हजार रुपये तोळा, असा अगडबंब उच्चांकी दर सोन्याने पाहिला आणि सोने घेऊ इच्छिणाऱ्यांची दातखीळ बसली. पण कोरोनाचा बहर जसजसा ओसरू लागला तसतशा सोन्याच्या किमतीही घरंगळू लागल्या. काय कारण असेल, या मागे. जाणून घेऊ या...

तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून दरांत घट होण्याची ५ कारणे...

कोरोनावर प्रभावी लस आल्याने

जागतिक भांडवली बाजारांमध्ये तेजी आल्यामुळे

अमेरिकेत सरकारी बॉण्ड्सना मागणी वाढल्याने

अमेरिकी डॉलर पुन्हा मजबूत झाल्यामुळे

या सगळ्या गोष्टी जुळून आल्याने लोकांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली

समजून घ्या... मुळात सोन्याच्या दरांनी उसळी घेतलीच का?

भारतीयांमध्ये तर सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. जगात सोन्याला सर्वाधिक मागणी भारतातूनच असते

सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित समजली जातेकोरोनाकाळात आर्थिक आघाड्यांवर सार्वत्रिक अनिश्चितता होती

सोन्यातील गुंतवणूक आणि मागणीn सोन्याचे आकर्षण, म्हणून भारतात मागणीही मागणीnअनेक जण सोन्याचे दागिने करून ठेवतातnगुंतवणूक म्हणूनही सोने खरेदी केले जातेnदरवाढीमुळे सोन्याच्या मागणीत घट झाली होतीnआता दर घसरणीमुळे पुन्हा मागणी वाढू लागली आहे

सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्यात गुंतवणुकीची मानसकिता दिसलीसाहजिकच सोन्याची मागणी कोरोनाकाळात वाढली

सोने येणार का आणखी खाली?

तज्ज्ञांच्या मते नजीकच्या काळात तरी सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाही, उलटपक्षी येत्या काही काळात सोन्याचे दर ४३ हजार रुपये तोळ्यापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सोनं