Lokmat Money > बिझनेस न्यूज > पैसा वाढविण्याचे नियम असतात का?

पैसा वाढविण्याचे नियम असतात का?

Money: सुरक्षित गुंतवणूक करण्याचे सोपे नियम सांगा, असं अनेकजण म्हणतात. नियम अगदी सोपेच असतात. पण ते सोपे नियम नीट समजून तसं वागणं मात्र ‘अवघड’ असतं. अर्थात्, नियम सोपे असले तरी, ते निभावणं फार सोपं नसतं म्हणा, तरी सांगतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 05:16 AM2021-05-25T05:16:38+5:302021-05-25T05:17:17+5:30

Money: सुरक्षित गुंतवणूक करण्याचे सोपे नियम सांगा, असं अनेकजण म्हणतात. नियम अगदी सोपेच असतात. पण ते सोपे नियम नीट समजून तसं वागणं मात्र ‘अवघड’ असतं. अर्थात्, नियम सोपे असले तरी, ते निभावणं फार सोपं नसतं म्हणा, तरी सांगतो. 

Are there rules for raising money? | पैसा वाढविण्याचे नियम असतात का?

पैसा वाढविण्याचे नियम असतात का?

- पी. व्ही. सुब्रमण्यम
(आर्थिक सल्लागार)
सुरक्षित गुंतवणूक करण्याचे सोपे नियम सांगा, असं अनेकजण म्हणतात. नियम अगदी सोपेच असतात. पण ते सोपे नियम नीट समजून तसं वागणं मात्र ‘अवघड’ असतं. अर्थात्, नियम सोपे असले तरी, ते निभावणं फार सोपं नसतं म्हणा, तरी सांगतो. 
१. कॉमनसेन्स वापरा
आता हा काही नियम आहे का? पैशाअडक्याच्या व्यवहारात?- तर आहे. आपल्याला उगीच वाटतं की, ज्या गोष्टी करायला फार अवघड, गुंतागुतीच्या त्याच करणं म्हणजे यश. असं काही नाही. साधी गोष्ट आहे, महाग किमतीचे शेअर चांगले रिटर्न देतात, त्याचवेळी कमी किमतीचे शेअर्सही चांगले रिटर्न देत असतील, तर कमी किमतीचे घ्या. कॉमनसेन्स आहे. महाग तेच चांगलं, असं कशाला? रिटर्न चांगलं येणं महत्त्वाचं. 
२. बी अ कॉण्ट्रारिअन
म्हणजे काय, तर अशी व्यक्ती व्हा, जी लोकप्रिय काय आहे. बाकीचे लोक कशात पैसे गुंतवतात, कोणते शेअर्स घेतात या लोकप्रिय मतांचा विचार न करता, आपल्याला योग्य काय वाटतं तेच करते. त्याला कॉण्ट्रारिअन म्हणतात. हे करणं सोपं नाही, मात्र आपला अभ्यास, कॉमनसेन्स काय म्हणतो त्यावर निर्णय घ्या.
३. गृहपाठ करा
अभ्यास अनेकांना करायचा नसतो, त्यातही गृहपाठाची तर नावडच. पण गुंतवणूक करायची, आपला पैसा वाढीस लावायचा, तर प्रश्न विचारा, माहिती काढा, अभ्यास करा. १०० चे एकदम २०० रुपये गुंतवा असं नाही. ११५ रुपये गुंतवा, बघा कसे रिटर्न येतात. २-३ वर्षे हळूहळू पैसे कसे वाढतात ते पाहा आणि त्या अभ्यासावर पुढचे निर्णय घ्या.
४. मेक अ बिग बेट 
तुमचा अभ्यास, आत्मविश्वास, रिसर्च हे सारं जर अनुकूल असेल आणि तुम्हाला कळत असेल की, या योजनेत फायदा आहे, तर त्यात मोठी बेट लावा. ५० कशाला ५०० शेअर्स घ्या. भरवसा स्वत:वर ठेवा की, आपला निर्णय चुकणार नाही. 
५. रिस्क आणि रिवाॅर्ड 
तुम्ही सतत रिस्कचाच विचार करत राहिलात, धोका टाळलात, तर मोठा परतावा मिळणारच नाही. त्या दोघांचं नातं आहेच. त्यात कमी कालावधीत अगदी थोडा तोटा झाला तरी, दीर्घ काळात फायदा होणार असेल, तर तसा विचार करा. धोके टाळले तर परतावे कसे मिळतील? 

Web Title: Are there rules for raising money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.