Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेन्शनर आहात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, १ ऑक्टोबरपासून लाईफ सर्टिफिकेट सादर करता येणार, वाचा

पेन्शनर आहात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, १ ऑक्टोबरपासून लाईफ सर्टिफिकेट सादर करता येणार, वाचा

सरकारनं पेन्शनधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा नक्की कशाप्रकारे मिळणारे दिलासा.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 01:49 PM2023-10-06T13:49:27+5:302023-10-06T13:49:51+5:30

सरकारनं पेन्शनधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा नक्की कशाप्रकारे मिळणारे दिलासा.

Are you a pensioner Important news life certificate can be submitted from October 1 super senior citizen | पेन्शनर आहात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, १ ऑक्टोबरपासून लाईफ सर्टिफिकेट सादर करता येणार, वाचा

पेन्शनर आहात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, १ ऑक्टोबरपासून लाईफ सर्टिफिकेट सादर करता येणार, वाचा

Life Certificate : सरकारनं सुपर सीनिअर सीटिझन्सना दिलासा दिला आहे. सुपर सीनिअर सीटिझन्स म्हणजेच ज्यांचं वय ८० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत त्यांचे लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. त्यांना त्यांचं लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी सुमारे २ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याच वेळी, ६० ते ८० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हीच प्रक्रिया १ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होईल. 

निवृत्ती वेतन वेळेवर मिळावं यासाठी निवृत्तीवेतनधारकांना त्यांचं लाईफ सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे. सर्व पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांचं लाईफ सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे. जर त्यांनी असं केलं नाही तर त्यांना पेन्शन मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

पेन्शनधारकांसाठी सरकारच्या डिजिटल लाइफ सर्टिफिकेट योजनेचा उद्देश हा आहे की पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत जावं लागणार नाही. ते घरबसल्या आपलं लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. अनेकवेळा पेन्शनधारकांना ब्रान्चमध्ये जाऊन लाईफ सर्टिफिकेट सादर करणं कठीण होतं. तुमचा आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक्स वापरून तुम्ही डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट करू शकता.

काय आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट?
पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक्स-सक्षम डिजिटल सेवेला जीवन प्रमाण म्हणतात. केंद्र, राज्य किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे पेन्शनधारक ही सेवा वापरू शकतात.

आयुष्यभरासाठी वैध असतं का?
लाईफ सर्टिफिकेट एका वर्षासाठी वैध आहे. पुढील वर्षी तुम्हाला तुमचे लाईफ सर्टिफिकेट पुन्हा सादर करावं लागेल. लाईफ सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जिवंत आहात याचा पुरावा असतो.

डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कसं जमा कराल?
पेन्शनधारक सहा वेगवेगळ्या प्रकारे त्याचे लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतो. पेन्शनधारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट, बायोमेट्रिक्ससह डिजिटल सेवा उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये लाईफ सर्टिफिकेटदेखील सादर करू शकता.

Web Title: Are you a pensioner Important news life certificate can be submitted from October 1 super senior citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.