Lokmat Money > बिझनेस न्यूज > Savings आणि Current Account बाबत तुम्ही असता का कनफ्युज, जाणून घ्या दोन्हींतील फरक

Savings आणि Current Account बाबत तुम्ही असता का कनफ्युज, जाणून घ्या दोन्हींतील फरक

पाहा दोन्ही खात्यांमध्ये नक्की काय आहे फरक आणि कोण कोणतं खातं उघडू शकतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 01:40 PM2023-08-03T13:40:33+5:302023-08-03T13:41:08+5:30

पाहा दोन्ही खात्यांमध्ये नक्की काय आहे फरक आणि कोण कोणतं खातं उघडू शकतं...

Are you confused about Savings and Current Account know the difference between the two and check the benefits | Savings आणि Current Account बाबत तुम्ही असता का कनफ्युज, जाणून घ्या दोन्हींतील फरक

Savings आणि Current Account बाबत तुम्ही असता का कनफ्युज, जाणून घ्या दोन्हींतील फरक

Savings Account Vs Current Account : बँक खातं आता प्रत्येकासाठी एक महत्त्वाची गरज बनलं आहे. सॅलरी मिळवणारा कर्मचारी असेल किंवा शेतकरी, गृहणी, व्यवसायिक, प्रत्येकाचं बँकेत खातं नक्कीच असतं. अनेकदा आपण पाहतो सेव्हिंग आणि करंट अकाऊंटचा उल्लेख केला जातो. दोन्हीचा वापर भलेही पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी केला जात असेल. परंतु ही दोन्ही खाती सारखी नाहीत. यामध्ये बरंच अंतर आहे. याबाबत आपण जाणून घेऊया.

सेव्हिंग अकाऊंट
याला बचत खातं म्हणतात. बचतीसाठी कोणतीही व्यक्ती हे खातं उघडू शकते. त्यात कितीही रक्कम जमा केली तरी बँक त्यावर वेळोवेळी व्याज देते. पगारदार कर्मचारी आणि सामान्य लोक बहुतेक बचत खातीच उघडतात.

करंट अकाऊंट
याला चालू खातं म्हणतात. यामध्ये बचत खात्याप्रमाणे ठेवी आणि व्यवहारही केले जातात, परंतु यावर कोणतंही व्याज दिलं जात नाही. चालू बँक खातं अशा ग्राहकांसाठी आहे जे नियमितपणे मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार करतात. हे मुख्यतः व्यवसायासाठी उघडलं जातं. हे स्टार्टअप, पार्टनरशिप फर्म, एलएलपी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी इत्यादीद्वारे देखील उघडले जाऊ शकते. यामध्ये बचत खात्याइतके निर्बंध नसतात.

काय आहेत फीचर्स

  • बचत आणि चालू दोन्ही खात्यांमध्ये किमान शिल्लक असणं अनिवार्य आहे. बचत खात्यामध्ये, तुम्हाला झिरो बॅलन्स अकाऊंट आणि सॅलरी अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्याचा पर्याय मिळतो. परंतु हा पर्याय चालू खात्यात उपलब्ध नाही. तसंच, चालू खात्यातील किमान शिल्लक बचत खात्यापेक्षा किंचित जास्त आहे.
  • एका महिन्यात बचत खात्यात किती व्यवहार करता येतील यावर मर्यादा आहे, परंतु चालू खात्यात अशी मर्यादा नाही. याशिवाय, बचत खात्यात जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याची मर्यादा आहे, तर चालू खात्यात अशी कोणतीही मर्यादा नाही.
  • बचत खात्यातील रकमेवर व्याज मिळतं आणि ग्राहकाला व्याजाच्या रूपात मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येतं. तर चालू खात्यात कोणतेही व्याज मिळत नाही, त्यामुळे ते कराच्या कक्षेबाहेर आहे.

Web Title: Are you confused about Savings and Current Account know the difference between the two and check the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.