आरोग्यम् धनसंपदा असं म्हटलं जातं. परंतु अनेक वेळा विविध आजारांमुळे किंवा इतर अनुचित घटनांमुळे आपल्याला रुग्णालयाची पायरी चढवी लागते. रुग्णालयांमध्ये महागड्या उपचारांसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे आरोग्य विम्याचे कवच असेल तर तुमचे सर्व खर्च देखील सहज कव्हर केले जातात. तुमचा उपचार कोणत्याही अडचणींशिवाय होऊन जातो. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्याकडे आरोग्य विमा (Health Insurance) असणं आवश्यक आहे. भविष्यात अशा कोणत्याही गोष्टींची अडचण होऊ नये म्हणून हा विमा असावाच. तर पाहूया कशी करू शकता तुम्ही हेल्थ इन्शुरन्सची निवड.
कव्हरेजवर लक्ष द्या
तुम्ही अशी पॉलिसी निवडा ज्यामध्ये अनेक आजार कव्हर असतील. पॉलिसीमध्ये रुग्णालयाचा खर्च, दाखल झाल्यानंतरचा खर्च, सोबतच औषधांचा खर्च सामील आहे का नाही हे नक्की पडताळून पाहा. या पॉलिसीमध्ये तुमच्या घरातील सदस्यही सामील असणं महत्त्वाचं आहे.
परवडणारा असावा
पॉलिसीची निवड अशी करा, ज्याचा हप्ता भरणं तुम्हाला सहजरित्या परवडेल. पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला तुमच्या बचतीकडेही लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्हाला जितका प्रीमिअम भरणं शक्य आहे, अशाच पॉलिसीची निवड करा.
कालावधी
तुम्ही असा प्लॅन निवडा,जो अधिक वर्षांपर्यंत तुम्हाला लाभ मिळवून देऊ शकेल.असा प्लॅन निवडा जो तो लाइफटाइम नूतनीकरणाची सुविधा देत राहिल. अनेकदा सुरुवातीच्या कालावधीऐवजी नंतर हेल्थ इन्शूरन्सची गरज अधिक लागलेत. यामुळे दीर्घ कालावधीच्या प्लॅनची निवड करा.
पेमेंट सेटलमेंट पाहा
पॉलिसी निवडण्यापूर्वी पॉलिसी सेटलमेंटची पद्धत काय आहे ते पडताळून पाहा. यासाठी किती कालावधी लागतो हे तपासा. गरजेच्या वेळी तुम्हाला किती लाभ मिळू शकतो, अशा गोष्टींचीही पॉलिसी घेताना नक्की काळजी घ्या.