Lokmat Money > बिझनेस न्यूज > नवीन वर्षात कार विकत घेण्याचा प्लान आहे का? फॉलो करा या टीप्स, मिळेल चांगली डील

नवीन वर्षात कार विकत घेण्याचा प्लान आहे का? फॉलो करा या टीप्स, मिळेल चांगली डील

Car Buying New Year 2025 : जर तुम्हीही या नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:20 IST2025-01-01T15:17:08+5:302025-01-01T15:20:35+5:30

Car Buying New Year 2025 : जर तुम्हीही या नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

Are you planning to buy a car in the new year 2025 Follow these tips you will get a good deal | नवीन वर्षात कार विकत घेण्याचा प्लान आहे का? फॉलो करा या टीप्स, मिळेल चांगली डील

नवीन वर्षात कार विकत घेण्याचा प्लान आहे का? फॉलो करा या टीप्स, मिळेल चांगली डील

Car Buying New Year 2025 : आजपासून नवीन वर्ष सुरू झालंय. तुम्ही नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजना आखल्या असतील. काही जणांनी नवीन वर्षाच्या निमित्तानं नवी कार खरेदी करण्याची योजना आखली असेल. जर तुम्हीही या नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्हाला एक चांगली डीलही मिळू शकते.

ऑटो सेक्टरचं २०२४ हे वर्ष खूप चांगलं गेलं. वर्षभरात अनेक कार लॉन्च झाल्या. त्याचबरोबर २०२५ हे वर्ष वाहन क्षेत्रासाठीही अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या वर्षातही अनेक शानदार कार लॉन्च होणार आहेत. अशावेळी कार खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक कारची माहिती नक्की घ्या.

आपल्या गरजा ओळखा

जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी तुमच्या गरजा ओळखायला हव्यात. हल्लीच्या कारमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स पाहायला मिळतील. यातील काही फीचर्स अशीही असतील ज्याची तुम्हाला गरज नसेल. अशावेळी अशी कार निवडा ज्याचे सर्व फीचर्स तुमच्यासाठी आवश्यक असतील. अधिक फीचर्स असलेली कार खरेदी करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

ऑन रोड किंमत पाहा

सर्व गाड्यांच्या ऑन रोड किमती वेगवेगळ्या असतात. प्रत्येक राज्यात कराचे दर वेगवेगळे असतात, त्यामुळे राज्य बदलल्यानं गाडीच्या किमतीतही बदल होत असतात. अशावेळी कार खरेदी करण्यापूर्वी आजूबाजूच्या स्थितीची माहिती घ्या.

Web Title: Are you planning to buy a car in the new year 2025 Follow these tips you will get a good deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.