लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात महागाई आणि मंदीची लाट असून, नागरिक अधिक बचतीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यात त्यांना यश येताना दिसत नाही. बाजारातील अस्थिरता आणि महागाईने त्यांची संपूर्ण बचत संपवली असून, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नागरिक कशाला प्राधान्य देत आहेत ते जाणून घेऊ...
आर्थिक स्थिती बिघडली?
एक तृतीयांशपेक्षा जास्त अमेरिकन लोक म्हणतात की, ते गेल्या वर्षीपेक्षा वाईट आर्थिक स्थितीत पोहोचले आहेत. लोकांपुढे नोकरीपेक्षा महागाईची सर्वांत मोठी चिंता असून, तो त्यांच्यासाठी मोठा आर्थिक धक्का आहे. आर्थिक मंदीचा फटकाही नागरिकांना बसत आहे. लोकांना सध्या आहे त्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे.
आर्थिक बचत कुणाची अधिक?
जनरेशन झेड (१९९० ते २०१० दरम्यान जन्मलेले) ८१% मिलेनियल्स (१९९७ ते २०१० दरम्यान जन्मलेले) ७७% जनरेशन एक्स (१९६५ ते १९९० दरम्यान जन्मलेले) ६७% बुमर्स (१९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेले) ५१%
आव्हान काय?
४३% महागाईचा दैनंदिन खर्च आणि बचतीवर परिणाम३९% आर्थिक अनिश्चितता/मंदी३८% अनपेक्षित खर्च२५% राजकीय अनिश्चितता
फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सचा वार्षिक आर्थिक संकल्प अहवाल
६६% लोकांनी आर्थिक बचतीचा संकल्प केला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ६८% इतके अधिक होते.३७% लोक म्हणतात की, महागाईमुळे गेल्या वर्षीपेक्षा कमी पैसे खिशात राहतात. महागाईने प्रत्येक दिवशी होणारा खर्च आणखी वाढला.१९% मिलेनियल्स म्हणतात की, आपत्कालीन निधी पूर्णपणे संपला आहे.६५% लोक म्हणतात की, चालू आर्थिक वर्षात आमची स्थिती सुधारेल. गेल्या वर्षी हेच प्रमाण ७२ टक्के इतके होते.५३% अल्पकालीन गुंतवणूक उद्दिष्ट काय आहे?४७% दीर्घकालीन
लोकांनी काय ठरवले?
२८% कमी खर्च करणे३२% कर्ज फेडणे४०% पैशांची अधिक बचत