नवी दिल्ली : आपली विमाने सुरक्षित आहेत का, असा अत्यंत गंभीर प्रश्न एअर इंडियाच्या पायलटांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला विचारला आहे. तोट्यात असलेल्या एअर इंडियाच्या पायलटांचे वेतनही आता थकले असून, विमान देखभालीसाठी तरी कंपनीकडे पैसा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तोच पायलटांनी व्यवस्थापनासमोर उपस्थित केला.
भारतीय हवाई क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने वाढत असले तरी भारतीय विमान वाहतूक कंपन्यांची वित्तीय स्थिती वाईट आहे. एअर इंडिया आणि जेट एअरवेज या दोनच भारतीय कंपन्या लाँग हॉल विमाने वापरतात. या दोन्ही कंपन्यांची वित्तीय स्थिती वाईट आहे. जेटने एप्रिल-जून तिमाहीचा निकालच लांबणीवर टाकला आहे, तर एअर इंडियाने जुलै महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना अजूनही दिलेला नाही. पायलटांचे प्रतिनिधित्व करणाºया इंडियन कमर्शियल पायलट्स असोसिएशनने (आयसीपीए) कंपनी व्यवस्थापनास पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘नियमित व बंधनकारक देखभाल व दुरुस्तीसाठी तरी आपल्याकडे पैसे आहेत का? आपली विमाने सुरक्षित आहेत का?’ भारतीय विमान कंपन्यांच्या एकूण विदेशी वाहतुकीत एअर इंडिया आणि जेट एअरवेजचा वाटा तब्बल ३0.५ टक्के आहे. २0१७ मधील एकूण ५.९ कोटी आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी १.८ कोटी प्रवाशांची वाहतूक या कंपन्यांनी केली आहे.
>पायलटांचा पगार १५ महिने विलंबानेच
‘आयसीपीए’ने एअर इंडियाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सलग १५ व्या महिन्यात वेतनाला उशीर झाला आहे. वेतन कधी मिळेल, याबाबत काहीच निश्चित नाही. वित्तीय अनिश्चितता नैराश्य आणि तणावाचा स्रोत बनली आहे. अनावश्यक तणावाचा विमानाच्या सुरक्षेवरही परिणाम होत आहे.
आपली विमाने सुरक्षित आहेत का?
आपली विमाने सुरक्षित आहेत का, असा अत्यंत गंभीर प्रश्न एअर इंडियाच्या पायलटांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला विचारला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:54 AM2018-08-11T02:54:10+5:302018-08-11T02:54:55+5:30